Admission: एम. टेक, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू

13 जुलै रोजी अंतिम गुणवत्तायादी जाहीर होणार
Admission Process
एम. टेक, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू (Pudhari File Photo)
Published on
Updated on

पुणे: अभियांत्रिकी व एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून एम.टेक, एमसीए आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या पदवी तसेच पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी 9 जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

सीईटी कक्षाकडून एम. टेक, एमसीए आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यानुसार, या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 9 जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करण्याबरोबरच कागदपत्रे स्कॅन करणे आणि अपलोड करता येणार आहे. त्यानंतर 2 ते 10 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी किंवा प्रत्यक्ष पडताळणी करता येणार आहे. (Latest Pune News)

Admission Process
Flood Line Decision: पूररेषेचा निर्णय चार महिन्यांत घ्या; उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश

तसेच, 9 जुलैनंतर अर्ज नोंदणी करणार्‍या किंवा 10 जुलैनंतर कागदपत्रांची पडताळणी करणारे विद्यार्थी नियमित फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत. हे विद्यार्थी संस्थास्तरावरील फेर्‍यांसाठी पात्र ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यातून पात्र ठरणार्‍या विद्यार्थ्यांची 13 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्तायादी जाहीर करण्यात येणार आहे.

प्राथमिक गुणवत्ता यादीवर 14 ते 16 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर 18 जुलै रोजी एम.टेक, एमसीए आणि हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Admission Process
Pune Politics: फायद्या-तोट्याचा विचार करून ठाकरेंसमवेत युती; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सावध पवित्रा

अर्ज नोंदणीसाठी 1200 रुपये शुल्क

एमसीए व एम.ई, एम.टेक या अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1200 रुपये शुल्क आकारले आहे. तर अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1000 रुपये नोंदणी शुल्क आकारले आहे. तसेच, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1000 रुपये शुल्क, तर अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 800 रुपये नोंदणी शुल्क आकारले आहे.

...असे आहे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज नोंदणी - 9 जुलैपर्यंत

कागदपत्रे पडताळणी - 10 जुलैपर्यंत

तात्पुरती गुणवत्ता यादी - 13 जुलै

हरकती व आक्षेप नोंदणी - 14 ते 16 जुलै

अंतिम गुणवत्ता यादी - 18 जुलै

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news