Pune MPSC Students protest : पुण्यातील आंदोलनावरून उच्‍च न्‍यायालयाची राज्य सरकारसह, पोलिस आणि आयोजकांना नोटीस

आंदोलनकर्त्यांना निश्चित जागा देण्याची याचिकाकर्त्याची मागणी, बुधवारी होणार सुनावणी
 Mumbai High court
मुंबई उच्च न्यायालय / Mumbai High court pudhari file photo
Published on: 
Updated on: 

Pune MPSC Students protest : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्‍या आंदोलनांविरोधात "पुणेकर" नागरिकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह, पोलिस आणि आयोजकांना नोटीस बजावली आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

आंदोलनकर्त्यांना निश्चित करून एक जागा देण्याची याचिकाकर्त्याची मागणी

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनांविरोधात "पुणेकर" नागरिकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आंदोलकांनी तात्काळ जागा सोडावी, आंदोलनकर्त्यांना निश्चित करून एक जागा द्यावी तसेच आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी याचिकाकर्ते यांची न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

 Mumbai High court
Pune MPSC Students Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन; ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा

पुणे पोलिस आयुक्तांसह तिन्ही आंदोलनाच्या प्रमुख आयोजकांना नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह तिन्ही आंदोलनांचे आयोजक प्रमोद पाटील, नितीन आंधळे, चेतन वाघज यांना नोटीस बजावली आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

 Mumbai High court
Pune MPSC Student Protest विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा अधिकार कोणी दिला? : राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल

पुण्‍यात सलग सहा दिवस आंदोलन

पुण्‍यात १ ऑक्‍टोबरपासून एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच त्‍यांनी या आंदोलनात प्रत्‍यक्ष सहभागही नोंदवला आहे. तसेच काँग्रेसचे आमदार या आंदोलनात सोमवारी रात्री सहभागी झाले. सोमवारी रात्री महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनस्‍थळी भेट दिली. यावेळी सरकारवर चौफेर टीका करत विद्यार्थ्यांचे प्रश्‍न तत्‍काळ मार्गी लावा, असे आवाहनही त्‍यांनी केले. मंगळवारी या आंदोलनाचा सहावा दिवस होता. आता बुधवारी या आंदोलनाबाबत उच्‍च न्‍यायालयात होणार्‍या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 Mumbai High court
Raj Thackeray MPSC Protest : ‘महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकरीसाठी कोणाचेही पाय धरायला तयार’ : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरेंचे विधान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news