Pune MPSC Student Protest विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा अधिकार कोणी दिला? : राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल

पुणे येथे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनास्थळी भेट, मागण्या मान्य होईपर्यंत पाठिंबा
Raju Shetti
Raju Shetti Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे : न्याय आणि सत्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास देऊन त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा अधिकार कोणाला दिला, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी केला. 'आम्हाला परीक्षेत उत्तीर्ण करा,' अशी विद्यार्थ्यांची मागणी नाही. प्रशासनात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांच्या मागण्या आहेत. त्यांच्या अपेक्षा माफक असून, त्या पूर्ण करण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, असे शेट्टी यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन शेट्टी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 'मंत्रालयात सत्तेत बसलेल्या लोकांनी आपले जुने व्हिडीओ काढून पाहावेत. तेही संघर्ष करून आणि घासाघीस करूनच आजच्या स्थानावर पोहोचले आहेत. यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये त्यांनी केलेली भाषणे आठवून पाहावीत. सत्ता मिळेपर्यंत सामान्यांची भाषा करायची आणि सत्ता आली की बघून घेण्याची भाषा करायची, हे योग्य नाही,' अशी टीका शेट्टी यांनी केली.

Raju Shetti
Pune MPSC Student Protest | एमपीएससी वर्णनात्मक पॅटर्न कायम ठेवावा, अलका चौकात विद्यार्थ्यांचे आंदोलन!

'महाराष्ट्र हा महापुरुषांचा आहे. येथे दादागिरीची भाषा चालणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या लोकांनी विद्यार्थ्यांना त्रास दिला, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल,' असा इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा असून, त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहू, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news