MPSC Group C Main Exam: एमपीएससी गट क मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; 1884 पदांसाठी मोठी भरती

12 जुलैला परीक्षा; सहा केंद्रांवर होणार आयोजन, अर्ज प्रक्रियेला सुरुवात
MPSC
MPSC Pudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीने गट ‌‘क‌’ सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-2025 च्या तारखा आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या जाहिरातीनुसार, ही मुख्य परीक्षा 12 जुलैला होणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांना 4 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तर, चलन मिळवण्याची 6 जून आणि बँकेत शुल्क जमा करण्यासाठी 8 जूनपर्यंत मुदत दिली आहे.

MPSC
Pune Property Tax Discount 2026: पुणेकरांसाठी शेवटची संधी; मिळकतकर सवलत फक्त 31 मेपर्यंत

गट क पदांसाठी यापूर्वी 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा 11 जानेवारी 2026 रोजी घेतली होती आणि त्याचा निकाल 4 मे रोजी जाहीर केला आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या सहा केंद्रांवर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

MPSC
Pune Tree Cutting Controversy: महापौर बंगल्यात 21 झाडांची कत्तल; चौकशी अहवाल महिनाभरापासून रखडला

मुख्य परीक्षा एकूण 400 गुणांची असेल. त्यात प्रत्येकी 200 गुणांचे दोन पेपर असतील. परीक्षेत 1/4 म्हणजे 25 टक्के नकारात्मक गुणपद्धती लागू राहणार आहे. एखाद्या प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक पर्याय निवडल्यास ते उत्तर चुकीचे मानले जाईल आणि त्यासाठी गुण कपात केली जाईल. उमेदवारांनी सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

एकूण 1884 पदांसाठी होणार भरती

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1 हजार 884 पदे भरली जाणार आहेत. यात लिपिक-टंकलेखकाची 1 हजार 673, कर सहाय्यकाची 73, दुय्यम निरीक्षकाची 125, उद्योग निरीक्षकाची 9 आणि तांत्रिक सहाय्यकाची 4 पदे आहेत. ही पदे विविध सरकारी विभागांमध्ये उपलब्ध आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news