MPSC Exam Date Change: एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या! गट ब आणि गट क नव्या तारखा जाहीर

नगरपालिका मतमोजणीचा परिणाम; गट ब परीक्षा आता ४ जानेवारीला, तर गट क ११ जानेवारीला — उमेदवारांमध्ये दिलासा पण यूजीसी नेटशी धडक
MPSC Exam
MPSC ExamPudhari Photo
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने गट ब आणि गट क परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गट ब परीक्षा आता ४ जानेवारीला तर गट क परीक्षा ११ जानेवारीला आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPSC Exam
Pune Airport Leopard: विमानतळावर पुन्हा बिबट्या! इंडिगो गोंधळात वनविभागाची मोहीम ठप्प

राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 'गट ब' ची परीक्षा आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २१ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत आयोजित केली जाणार होती. परंतु आता ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. तर 'गट क' ची परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

MPSC Exam
Baba Adhav Passes Away: कष्टकऱ्यांचा तारणहार डॉ. बाबा आढाव यांचे निधन

राज्य निवडणूक आयोगाच्या २ डिसेंबर २०२५ च्या आदेशानुसार, नगरपालिका परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका २०२५ ची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती. यामुळे एमपीएससी परीक्षेच्या तारखेशी थेट संघर्ष निर्माण झाला. एमपीएससीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी घेतल्यास उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांबद्दल माहिती मागवली होती.

MPSC Exam
PYC Tennis League: व्हॅली हंटर्सचा दमदार विजय! पीवायसी टेनिस लीगचे विजेतेपद पटकावले

त्यासंदर्भात अनेक जिल्हा केंद्रांनी अहवाल दिला की परीक्षा उप-केंद्रांची मतमोजणी स्थळांशी जवळीक, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, उमेदवारांची विजय मिरवणूक आणि परीक्षा कर्तव्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता यासारख्या कारणांमुळे नियोजित परीक्षा आयोजित करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. या आव्हानांचा आणि परीक्षा प्रक्रियेतील संभाव्य व्यत्ययांचा विचार करून, एमपीएससीने परीक्षा त्यांच्या मूळ नियोजित तारखेपासून पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.

MPSC Exam
Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन घोटाळ्यात नवा पर्दाफाश! सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु जेरबंद

आता यूजीसी नेट आणि गट ब परीक्षा एकाच दिवशी...

एमपीएससीने परीक्षांची सुधारित तारीख जाहीर केली असली तरी आता 4 जानेवारीला घेण्यात येणारी गट ब परीक्षा आणि यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या दोन्ही परीक्षांचे अर्ज भरले आहेत. त्या संबंधित उमेदवारांना कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news