पुणे : अनैतीक सबंधास अडथळा ठरत असलेल्या मुलाचा आईने केला खून

पुणे : अनैतीक सबंधास अडथळा ठरत असलेल्या मुलाचा आईने केला खून

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

अनैतिक सबंधास अडथळा ठरत असलेल्या मुलाचा त्याच्याच आईने गळा आवळून खून केल्याची घटना नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे येडगाव, भोरवाडी गावच्या हद्दीत सुवर्ण पॅलेस लाॅजचे बाजुला घडली. ही माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. राज सचिन कदम (वय १३) असे मृत मुलाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी मुलाची आई विद्या सचिन कदम हिला ताब्यात घेतले आहे.

परकरच्या नाडीने आवळला गळा

याबाबतची फिर्याद सचिन शंकर कदम (वय ४१, सुरक्षारक्षक, रा. ओव्हाळ वस्ती मज्जिद शेजारी, लोहगाव पुणे ४७) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्या हिचे प्रियकर दत्तात्रय गोविंद औटी (रा इनाममळा बोरी बुद्रुक, ता. जुन्नर) याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. या संबधात राज मुळे अडथळा होत होता. त्यामुळे विद्या हिने दि. २० जानेवारी रोजी मुलगा झोपेतच असताना परकरच्या नाडीने गळा आवळुन मुलाचा खून केला. त्यानंतर त्याच्या छातीवर प्लास्टीकच्या झाडूने मारहाण केली.

ससूनमध्ये दिली खोटी माहिती

यानंतर त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून त्यास नारायणगाव येथील श्री हाॅस्पीटल येथे आणले. डाॅक्टरांनी त्यास पुण्यातील ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यास सांगीतल्याने त्यास तेथे नेण्यात आले. उपचारादरम्यान दि. २७ जानेवारी रोजी रात्री १२ च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत विद्या कदम हिने ससून रुग्णालयात खोटे कारण सांगून घडलेली माहीती लपवली व मुलाचा अंत्यविधी उरकून टाकला.

याबाबतची कागदपत्र पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर सदर मयताचा प्राथमिक तपास करताना पोलिसांना मुलाचा घातपात झाल्याचा संशय आल्याने त्यांनी विद्या कदम हिची सखोल चौकशी केली. तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच तिच्या बोलण्यात विसंगती आढळुन आली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने मीच माझ्या मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळुन खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगावचे सहायक पोलीस निरिक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, सफौ केंगले, सफौ ढमाले, पोलिस हवालदार टाव्हरे, पोलीस जवान नविन अरगडे, सचिन कोबल, शाम जायभाये, संतोष सांळुके, शैलेश वाघमारे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news