

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात क्षीण झालेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पुणे घाटमाथ्याला रविवार आणि सोमवार असा दोन दिवस अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांना मुसळधारेचा ऑरेज अलर्ट तर 19 जिल्ह्यांना मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
संपूर्ण देशात पाऊस वाढला असून काश्मिरपासून दिल्ली, हरियाना, उत्तर भारत, मध्यप्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात 5 ते 10 जुलै या कालावधीत बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर वाढल्याने देशातील पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, दक्षिण कर्नाटक, जम्मू, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, ओडिशा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
रेड अलर्ट (अतिमुसळधार): पुणे घाटमाथा (6 व 7 )
ऑरेंज अलर्ट (मुसळधार): पालघर (6), ठाणे (6),रायगड (6,7), रत्नागिरी (6,7), सिंधुदुर्ग (6), नाशिक घाट (6,7), कोल्हापूर घाट (6), सातारा घाट (6,7), भंडारा (7).
यलो अलर्ट (मध्यम पाऊस): पुणे घाट (8,9), मुंबई (6,7), सिंधुदुर्ग(7 ते 9), धुळे (6,7), नंदुरबार (6,7), नाशिक (7), कोल्हापूर ((7 ते 9), सातारा घाट (9), छ.संभाजीनगर (6,7), जालना (6,7), परभणी (6,7), बीड (6), हिंगोली (6,7), भंडारा (7,8), चंद्रपूर (7 ते 9), गडचिरोली (7 ते 9), नागपूर (7 ते 9), वर्धा (6,7)