पुणे : फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने उकळले पैसे

पुणे : फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने उकळले पैसे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन युवतीकडून एकाने 1 लाख 21 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी युवतीच्या 44 वर्षीय आईने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी इंस्टाग्राम खातेधारकाच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल 2022 ते 19 जुलै 2023 या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादींच्या 18 वर्षीय मुलीसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. त्यानंतर प्रेमाचे खोटे नाटक करून तिला जाळ्यात खेचले. त्यानंतर व्हॉटस्अप कॉल करून युवतीचे खासगी क्षणातील फोटो काढून घेतले. पुढे तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीकडे पैशांची मागणी केली. युवतीनेदेखील भीतीपोटी वेळोवेळी त्याला आईच्या बँक खात्यातून ऑनलाइन 1 लाख 21 हजार रुपये हवाली केले. दरम्यान, हा प्रकार फिर्यादींच्या लक्षात आला. त्या वेळी त्यांना पंधरा हजार रुपये परत केले. त्यानंतर फिर्यादींनी याबाबत लष्कर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास लष्कर पोलिस करीत आहेत.

नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

खेळण्या-बागडण्याच्या वयात हैवानाने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले.. आजीचा भाऊ आजोबा म्हणून ती त्याच्या शेजारी झोपली. तिला पुसटशी कल्पनादेखील नसेल की आपल्यासोबत असे घृणास्पद कृत्य होईल म्हणून. लैंगिक अत्याचार होऊनदेखील ती भीतीपोटी कोणाशी बोलली नाही. मात्र, शाळेत दामिनी मार्शलनी 'गुड टच आणि बॅड टच'ची कार्यशाळा घेतली. त्या वेळी तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती त्यांना दिली. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी 42 वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सहा ते सात महिन्यांपूर्वी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी दामिनी मार्शलची पथके तैनात केली आहेत. शाळा, कॉलेज परिसरात या पथकांकडून गस्त दिली जाते आहे. त्याचबरोबर शाळेत जाऊन समुपदेशन आणि 'गुड टच आणि बॅड टच'चे प्रशिक्षणदेखील दिले जात आहे. दामिनी मार्शल वनिता पाटील या कर्तव्यावर असताना, पीडित मुलीच्या शाळेत कार्यशाळा घेत होत्या. त्यावेळी पीडित मुलीने आपबीती सांगितली. आजीचा चुलत भाऊ त्यांच्या घरी आला होता. त्याने एका रात्री तिच्याजवळ झोपून लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार समजताच पाटील यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नराधमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news