Mojtaba Khamenei Iran Supreme Leader: इराणची धार्मिक राजवट कायम; मोजतबा खामेनी सर्वोच्च नेते, अमेरिकेचा डाव फसला

अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर मुलगा मोजतबा खामेनी यांची निवड; तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता
Mojtaba Khamenei Iran Supreme Leader
Mojtaba Khamenei Iran Supreme LeaderPudhari
Published on
Updated on

- शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र विश्लेषक

पुणे : इराणमधील धार्मिक राजवट उलथवून टाकण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलने इराणबरोबर संघर्ष सुरू केला आणि इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांच्यावर हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवून आणला. त्यानंतर त्या ठिकाणी कोणताही नेता निवडण्यासाठी परवानगी घेण्याची अट अमेरिकेने इराणसमोर ठेवली होती. परंतु, अमेरिकेच्या या मागणीला केराची टोपली दाखवत त्यांच्या नाकावर टिच्चून इराणकडून मोजतबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेचा इराणमधील धार्मिक राजवट उलथवण्याचा डाव फसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mojtaba Khamenei Iran Supreme Leader
Maharashtra Heatwave: मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

इराण अण्वस्त्रांची निर्मिती करतोय, त्यांच्याकडे बॅलेस्टिक मिसाईल्स आहेत, संपूर्ण आखातामध्ये इराण अशांतता पसरवतोय, अस्थिरता निर्माण करतोय, ही कारणे सांगत अमेरिका आणि इस्रायलने इराणबरोबर संघर्ष सुरू केला होता. परंतु, इराणवर हल्ला करण्याचे प्रमुख कारण हे तेथील धार्मिक राजवट उलथवून टाकणे हेच होते आणि त्या ठिकाणी इस्रायल, तसेच अमेरिकापुरस्कृत शासन आणायचे, हेच अमेरिका आणि इस्रायलचे धोरण असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. यानंतर अयातुल्ला खामेनी यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्यात आले. अनेक देशांवर हल्ले झाले. त्यातून 13 देशांना युद्धात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घ्यावा लागला. एवढे सगळे कशासाठी घडले,तर इराणमध्ये असलेली धार्मिक राजवट उलथवून टाकण्यासाठी. परंतु, सगळे उलटेच झाले असल्याचे दिसून येत आहे. इराणची धार्मिक राजवट संपलेली नसून, ती पुढे सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, अयातुल्ला खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते म्हणून निवड करण्यात आल्याचे इराणने जाहीर केले आहे.

Mojtaba Khamenei Iran Supreme Leader
JNPT Containers Loot: जेएनपीए बंदरात अडकलेल्या कंटेनर्सवर एजंटांची लूट; एका कंटेनरसाठी 3–4 लाखांची वसुली

मोजतबा खामेनी यांचे वय 56 आहे. अमेरिकेने अयातुल्ला खामेनी यांच्यावर केलेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. मोजतबा खामेनी यांचे इराणच्या लष्कराशी अर्थात रिव्होल्युशनरी गार्डबरोबर अत्यंत जवळचे संबंध आहेत. 2019 सालीदेखील अयातुल्ला खामेनी यांच्यानंतर इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेतेपदी कुणाची निवड करायची, याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, घराणेशाही इराणमध्ये नको, असे सांगत अयातुल्ला खामेनी यांच्याकडूनच मोजतबा खामेनी यांच्या नावाला विरोध झाला होता. परंतु, आता मात्र त्यांची सर्वोच्च धार्मिक नेतेपदी निवड झाली आहे.

इराणच्या राज्यघटनेत सर्वोच्च धार्मिक नेतेपदाची तरतूद आहे. त्यामुळे हे घटनात्मक पद आहे. कौन्सिल ऑफ एक्स्पर्ट हे इराणमधील सर्वोच्च धार्मिक नेतेपदाची निवड करत असतात. यामध्ये तब्बल 88 सदस्य आहेत. त्या 88 सदस्यांना मान्यता देणारी एक गार्डियन कौन्सिल आहे. हे सर्व एक्स्पर्ट शिया पंथीय धर्मगुरू असतात. कौन्सिल ऑफ एक्स्पर्टची निवड आठ वर्षांसाठी करण्यात येते. त्यांची निवड सामान्य जनतेमधूनच करण्यात येते. या 88 लोकांमधून इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता निवडला जातो.

Mojtaba Khamenei Iran Supreme Leader
Gas Shortage Hotels Impact: गॅस टंचाईचा हॉटेल व्यवसायाला फटका; मुंबईतील 20% हॉटेल्स बंद

इराण या संघर्षात टिकून राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील रिव्होल्युशनरी गार्ड आहेत. त्यांच्याबरोबर मोजतबा खामेनी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तसेच, अमेरिकेने मोजतबा खामेनी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू घडवून आणला आहे. त्यामुळे मोजतबा खामेनी आता सुडाने पेटून उठले आहेत. आता त्यांच्यापुढे दोन महत्त्वाचे प्राधान्यक्रम असणार आहेत. यामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाला योग्य दिशा देणे आणि आपली राजवट टिकवून ठेवणे होय. अमेरिकेने इराणचा पुढचा नेता निवडण्यासाठी अमेरिकेच्या परवानगीची पूर्व अट इराणसमोर ठेवली होती. इराणने अमेरिकेच्या या मागणीला केराची टोपली दाखवत आपला सर्वोच्च नेता निवडत अमेरिका, तसेच इस्रायलला एकप्रकारचा वेगळा संदेश दिला आहे. इस्रायलनेदेखील इराणला इशारा दिला होता की, इराणचा जो कोणी सर्वोच्च धार्मिक नेता असेल त्याच्यावरदेखील आम्ही अशाच प्रकारे हल्ला करू जसा हल्ला अयातुल्ला खामेनी यांच्यावर केला. परंतु, इराणने मात्र आम्ही कोणतीही तडजोड करणार नसून आमची धार्मिक राजवट अगोदर जशी होती तशीच पुढे सुरू राहणार असल्याचा इशारा मोजतबा खामेनी यांची निवड करून दिला आहे. असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत.

(शब्दांकन : गणेश खळदकर)

Mojtaba Khamenei Iran Supreme Leader
Maharashtra Auto Rickshaw Permit: नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना तात्पुरती स्थगिती; बाईक-टॅक्सी कंपन्यांचे परवानेही रद्द

कच्च्या तेलाच्या किमती वाढणार

संघर्ष सुरू होण्यापूर्वी जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती 72 डॉलर्स प्रतिबॅरल होत्या. त्यानंतर एका आठवड्यात 83 डॉलर्स प्रतिबॅरल आणि आता दुसऱ्या आठवड्यात 114 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. तर, पुढील काळात कच्च्या तेलाच्या किमती रेकॉर्डब्रेक वाढणार असून, 135 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news