Maharashtra Assembly Polls: मनसेकडून खडकवासल्यात पुन्हा वांजळे; 45 उमेदवारांची यादी जाहीर

Pune Political News: कोथरूडमधून अ‍ॅड. शिंदे, तर हडपसरमधून बाबर रिंगणात
Maharashtra Assembly Polls
मनसेकडून खडकवासल्यात पुन्हा वांजळे; 45 उमेदवारांची यादी जाहीरPudhari
Published on
Updated on

Pune Politics: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलेल्या 45 उमेदवारांच्या दुसर्‍या यादीत पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयूरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2009 च्या विधानसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोथरूड मतदारसंघातून माजी नगरसेवक अ‍ॅड. किशोर शिंदे यांना तर, हडपसरमधून शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे.

मनसेने 45 उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली. या यादीत कोथरूड, खडकवासला आणि हडपसरच्या उमेदवारांचा समावेश आहे. कोथरूडमधून उमेदवारी मिळालेल्या अ‍ॅड. शिंदे यांनी 2019 ला भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. त्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने त्यांना पाठिंबा दिला होता.

Maharashtra Assembly Polls
Maharashtra Assembly Polls: तिकिटासाठी मुंबईला गेलेल्यांची फडणवीस, बावनकुळे यांच्याकडून कानउघाडणी

या चुरशीच्या निवडणुकीत 25 हजार मतांनी शिंदे यांचा पराभव झाला होता. आता ते पुन्हा एकदा भाजपच्या पाटील यांच्या समोर उभे ठाकले असून शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर येथील तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मयूरेश वांजळे यांनी मनसेची उमेदवारी मिळवून सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यांचे वडील व सोनेरी आमदार अशी ओळख असलेले स्व. रमेश वांजळे यांनी याच मतदारसंघातून 2009 ला मनसेच्या उमेदवारीवर विजय मिळविला होता.

Maharashtra Assembly Polls
राधानगरीतून आबिटकर, करवीरमधून नरकेंना शिवसेनेकडून उमेदवारी

मात्र, त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली. त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले व खडकवासला मतदारसंघ भाजपकडे गेला.

आता पुन्हा जवळपास 12 वर्षांनंतर त्यांचे चिरंजीव मयूरेश खडकवासल्यात मनसेकडून नशिब आजमावणार आहेत, तर हडपसरमधून उमेदवारी जाहीर झालेले साईनाथ बाबर हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात गतवेळेस मनसेकडून वसंत मोरे यांनी निवडणूक लढविली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news