Maharashtra Assembly Polls: तिकिटासाठी मुंबईला गेलेल्यांची फडणवीस, बावनकुळे यांच्याकडून कानउघाडणी

Latest Political News: खडकवासलातील भाजप इच्छुकांची धावाधाव
Devendra Fadanvis and Chandrashekhar Bawankule
Maharashtra Assembly PollsPudhari News
Published on
Updated on

Pune Politics: खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर न केल्याने विद्यमान आमदारांसह इच्छुकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यातच उमेदवारीसाठी लॉबिंग करण्यासाठी मुंबईला गेलेल्या इच्छुकांसह पदाधिकार्‍यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.

भाजपने पहिल्या यादीत पुण्यातील तीन विद्यमान आमदारांची उमेदवारी जाहीर केली असतानाच खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील विद्यमान आमदारांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यातच खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीतील एका पदाधिकार्‍याचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा सोमवारी सायंकाळी रंगली.

Devendra Fadanvis and Chandrashekhar Bawankule
भाजपच्या यादीवरून मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी

त्यामुळे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्यासह अन्य इच्छुकांची चांगलीच धावपळ उडाली. त्यामुळे भाजप कार्यालयात सर्व माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन इच्छुकांनी बाहेरचा उमेदवार दिला तर आम्ही पक्षाचा राजीनामा देऊ, असा पवित्रा घेतला.

त्यानंतर मंगळवारी सकाळीच या माजी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी मुंबईकडे धाव घेतली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेत या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणार्‍या पदाधिकार्‍याच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. या सर्वांची बाजू ऐकून घेत बावनकुळे यांनी ही वेळ का आली याचे आत्मपरीक्षण करा, असे सांगत माझ्या काही गोष्टी चुकल्या म्हणून पक्षाने माझेही तिकीट कापले होते, असे सुनावले.

Devendra Fadanvis and Chandrashekhar Bawankule
राधानगरीतून आबिटकर, करवीरमधून नरकेंना शिवसेनेकडून उमेदवारी

त्यामुळे संबंधित इच्छुक उमेदवारांना चांगलाच घाम फुटला. उमेदवारीसाठी बावनकुळेंची मनधरणी केल्यानंतर या शिष्टमंडळाचा मोर्चा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचला. तिथेही फडणवीस यांनी मुंबईला येण्याची आवश्यकता नव्हती, असे सांगत या शिष्टमंडळांची कानउघाडणी केली. मला कोणालाही उमेदवारीचा शब्द देता येत नाही. मात्र, तुम्ही काम करत राहा, टेन्शन घेऊ नका, असे सांगत संबंधितांची पाठवणी केली. त्यामुळे आता उमेदवारी मिळणार की नाही, याची कोणतीही शाश्वती न घेता ही मंडळी पुण्याकडे रवाना झाली.

पुणे कॅन्टोन्मेंटमधील चित्र अस्पष्टच

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीवरून कलह सुरू आहे. या मतदारसंघात आयात उमेदवार येणार असल्याची चर्चा सोमवारी रंगली. मात्र, मंगळवारी ही चर्चा थंडावली असली तरी नक्की उमेदवारी कोणाला मिळणार, याचे चित्र अस्पष्टच होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news