राधानगरीतून आबिटकर, करवीरमधून नरकेंना शिवसेनेकडून उमेदवारी

कोपरी पाचपाखाडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maharashtra Assembly Election 2024
राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबिटकर तर करवीर मधून चंद्रदीप नरके यांना उमेदवारी.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केली. पहिल्याच यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबिटकर तर करवीर मतदारसंघातून चंद्रदीप नरके यांना उमेदवारी मिळाली आहे. सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव मात्र अद्याप जाहीर झालेले नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार्‍या जागांपैकी राधानगरी आणि करवीर मतदारसंघातून अनुक्रमे प्रकाश आबिटकर व चंद्रदीप नरके यांची नावे अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली आहेत. कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे पहिल्यापासून रिंगणात आहेत; तर ऐनवेळी भाजपचे राज्यसभेचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांचे नावदेखील चर्चेत आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. कोल्हापूर उत्तरची उमेदवारी कोणाला मिळणार हा जिल्ह्यात एकच चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्या यादीत उत्तरच्या उमेदवाराचे नाव असेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नसल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

शिवसेनेची यादी अशी आहे

एकनाथ शिंदे - कोपरी पाचपाखाडी, साक्री - मंजुळा गावीत, चोपडा - चंद्रकांत सोनवणे, जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील, पाचोरा - किशोर पाटील, एरंडोल - अमोल पाटील, मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील, बुलढाणा- संजय गायकवाड, मेहकर - संजय रायमुलकर, दर्यापूर - अभिजीत अडसूळ, आशिष जयस्वाल - रामटेक, भंडारा- नरेंद्र भोंडेकर, दिग्रस - संजय राठोड, नांदेडउत्तर - बालाजी कल्याणकर, कळमनुरी - संतोष बांगर, जालना - अर्जुन खोतकर, सिल्लोड - अब्दुल सत्तार, छत्रपती संभाजीनगर मध्य - प्रदीप जयस्वाल, छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय सिरसाट, पैठण - विलास भूमरे, माहिम -सदा सरवणकर, राजापूर - किरण सामंत, रत्नागिरी - उदय सामंत, खानापूर - सुहास बाबर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news