Mission Vatsalya Scheme Maharashtra: अनाथ बालके आणि विधवा महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’चा आधार; राज्यात अंमलबजावणी लवकरच

महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय; पुनर्वसन आणि विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नवी योजना राबविण्याची तयारी
Mission Vatsalya Scheme Maharashtra
Mission Vatsalya Scheme MaharashtraPudhari
Published on
Updated on

पुणे : कोविड या संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिला आणि अनाथ बालकांसाठी राज्य शासनाच्या वतीने ‌’मिशन वात्सल्य‌’ योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.(Latest Pune News)

Mission Vatsalya Scheme Maharashtra
Pune Rain: ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पावसाने झोडपले, भातपिकाचे मोठे नुकसान

कोविड या संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन तसेच त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने विधवा महिला, अनाथ बालके यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ संबंधितांना उपलब्ध करून देण्यासाठी ‌’शासन आपल्या दारी‌’ या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचीच पुढील अद्ययावत योजना म्हणजे ‌’मिशन वात्सल्य‌’ ही योजना आहे.

Mission Vatsalya Scheme Maharashtra
Pradhan Mantri Matru Vandana Yojana: ‘मातृवंदना’ योजनेने दिला महिलांच्या आरोग्याला नवा आधार

मिशन वात्सल्य या योजनेच्या माध्यमातून विधवा महिला, अनाथ बालक आणि परित्यक्ता महिला यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेची व्याप्ती अजून वाढविण्यात येणार आहे, असा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे.

Mission Vatsalya Scheme Maharashtra
Animal Cruelty Prevention Order: सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर बैलगाड्यांसाठी वजनकाटा बंद ठेवावा – साखर आयुक्तांचे निर्देश

काय आहे मिशन वात्सल्य योजना?

मिशन वात्सल्य ही भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाची योजना आहे. याअंतर्गत बालसंरक्षण प्रणाली मजबूत करण्याचा उद्देश आहे. केंद्राच्या सहभागातून राज्य शासनाने महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राज्यात ही योजना राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, कोविड या आजारानंतर विधवा महिलांना लाभ मिळावा, यासाठी त्यांना देखील या योजनेत समावेश करण्यात आला.

Mission Vatsalya Scheme Maharashtra
Jain boarding dispute Pune: जैन बोर्डिंग जागा विक्री व्यवहार ‘जैसे थे’; मंदिर पाहणीचे आदेश धर्मादाय आयुक्तांकडून

या योजनेत काय समाविष्ट आहे?

बालगृहे, अनाथ, निराधार किंवा अत्याचारग्रस्त मुलांसाठी, बालकांसाठी तात्पुरती आणि दीर्घकालीन देखभाल, पालकत्व दत्तक योजना बाल अधिकारांचे संरक्षण : बालकल्याण समित्यांची स्थापना, सक्षमीकरण, पुनर्वसन आणि पुनःएकत्रीकरण करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news