Maharashtra Mission Lakshyavedh Wrestling: मिशन लक्ष्यवेध कुस्ती योजनेवर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा आक्षेप

कुस्ती संघाची मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी थाळीनाद आंदोलन ६ एप्रिल रोजी आयोजित करणार
Kusti
KustiPudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‌‘मिशन लक्ष्यवेध‌’ कुस्ती निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र योजनेवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने गंभीर आक्षेप घेतले आहेत. ही योजना चुकीच्या पद्धतीने आणि कुस्तीगीर संघाला विश्वासात न घेता राबविली जात असल्याचा आरोप करीत संघाने 6 एप्रिल रोजी राज्यव्यापी ‌‘थाळीनाद‌’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Kusti
Junnar Girl Attack: महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हत्याराने निर्घृण हल्ला, आरोपी फरार

याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी क्रीडा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात योजनेतील अनेक त्रुटी मांडल्या आहेत. शासनाच्या नियोजनानुसार 10 वजनी गटांत केवळ 20 कुस्तीगीर निवडले जाणार आहेत.

Kusti
Iran US Israel Gulf Conflict: इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

मात्र, कुस्तीमध्ये सरावासाठी जोडीदाराची आवश्यकता असते. दुखापतींमुळे 15-20 टक्के खेळाडू विश्रांतीवर असतात. अशा वेळी मोजक्या खेळाडूंमुळे सराव करणे अशक्य होईल. यामुळे दर्जेदार कुस्तीगीर या योजनेत सहभागी होणार नाहीत आणि केवळ कागदोपत्री अंमलबजावणी होऊन शासनाच्या पैशाचा अपहार होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

Kusti
Pune Domestic LPG Supply: घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत; नागरिकांनी घाबरू नये

ही योजना केवळ ‌‘फ्री-स्टाईल‌’ कुस्तीसाठी मर्यादित असून, ग््राीको-रोमन आणि महिला कुस्तीगिरांबाबत यात स्पष्टता नाही. प्रशिक्षक आणि आहाराचा दर्जा काय असेल, याबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Kusti
Pune Hotels Gas Shortage: गॅस टंचाईचे संकट; पुण्यात हॉटेल-रेस्टॉरंट बंद होण्याची भीती

आंदोलनाचा पवित्रा

‌‘शासनाने या योजनेचे सध्याचे नियोजन त्वरित स्थगित करून कुस्तीगीर संघासोबत चर्चा करावी,‌’ अशी मागणी भोंडवे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास 6 एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा कार्यालयांसमोर थाळीनाद आंदोलन केले जाईल आणि क्रीडामंत्री व क्रीडा आयुक्तांचा निषेध केला जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news