Pune Crime: पुणे पुन्हा हादरलं! 50 वर्षाच्या व्यक्तीचं संतापजनक कृत्य, लहान मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Parvati Police Station: या घटनेनंतर पर्वती पोलीस ठाण्यासमोर स्थानिकांनी गर्दी केली.
Illustration of a child sitting with knees pulled close, with a dark shadow figure behind them on a red background.
Crime Against ChildrenPudhari
Published on
Updated on

Pune Parvati Child Abuse Case

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच आता पुणे शहरातही लहान मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पर्वती येथे 50 वर्षांच्या व्यक्तीने हे कृत्य केले असून या घटनेनं स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Illustration of a child sitting with knees pulled close, with a dark shadow figure behind them on a red background.
महाराष्ट्रात बालकांवरील अत्याचारांमध्ये वाढ

मंगळवारी रात्री पर्वती येथील जनता वसाहत भागात 50 वर्षांच्या व्यक्तीने लहान मुलीचे कपडे काढून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. हा प्रकार नागरिकांनी पाहिल्याने अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची त्या नराधमाच्या तावडीतून सुटका झाली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Illustration of a child sitting with knees pulled close, with a dark shadow figure behind them on a red background.
Pune Crime : पुणे पोलीस दलातील रिलस्टार सोनाली हिंगे बडतर्फ

दरम्यान, या घटनेनंतर पर्वती पोलीस ठाण्यासमोर स्थानिकांनी गर्दी केली. लहान मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या 'आरोपीला आमच्या ताब्यात द्या', अशी मागणी स्थानिक करत होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पोलीस ठाण्यासमोरील गर्दी हटवण्याचे प्रयत्न सुरू होते. नागरिकांनी घरी जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी हा पीडित मुलीचा नातेवाईक असल्याचे वृत्त आहे.

पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news