Pune Crime : पुणे पोलीस दलातील रिलस्टार सोनाली हिंगे बडतर्फ

पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, सुदाम तायडे हेही बडतर्फ
Pune Crime : पुणे पोलीस दलातील रिलस्टार सोनाली हिंगे बडतर्फ
Published on
Updated on

पुणे : प्राचार्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील रिलस्टार सोनाली हिंगे, पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, सुदाम तायडे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पुण्यातही एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना पॉक्सोच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत सात लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. तक्रारदार प्राचार्य हे धनकवडीत राहतात. जुलै 2025 मध्ये हे तिघे पोलीस तक्रारदार काम करत असलेल्या कॉलेजमध्ये गेले. एका विद्यार्थीनीला तुम्ही मेट्रो स्टेशनवरती बंदुकीचा धाक दाखवून तिला गाडीमध्ये ओढले असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आलेली आहे. ती मुलगी वयाने 18 वर्षाच्या आतील असल्याने पोक्सो कायद्यांन्वये तुमच्यावर कारवाई होवू शकते असे धमकावत पोलिसांनी प्राचार्यांकडून पैसे उकळले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच त्यांनी तत्काळ संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या सर्वांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news