Milk Price Hike: दूध दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा की तोटाच? पशुखाद्याचे दर गगनाला भिडल्याने दूध उत्पादक आर्थिक कोंडीत

गाईच्या दुधाला ४० ते ४२ रुपये लिटर, म्हशीच्या दुधाचे दरही वाढले; मात्र सरकी पेंड, भरड धान्य, गोळी पेंड आणि चाऱ्याच्या किमतीत मोठी वाढ
Milk
MilkPudhari
Published on
Updated on

निमोणे: सध्या दुधाला कधी नव्हे, इतर दर मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी ३५ ते ३६ रुपये लिटरने मिळणारे गाईचे दूध आजच्या घडीला ४० ते ४२ रुपये दराने विकले जात आहे. तसेच, म्हशीच्या दुधालाही सरासरी ५ रुपये वाढवून मिळतात. मात्र, या दोन-अडीच महिन्यांत पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दूध दरवाढीचा काहीच फायदा होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Milk
Pune Ganeshotsav Traffic Changes: पुण्यात गणेशमूर्ती खरेदीसाठी वाहतूक बदल! डेंगळे पूल, शिवाजी रस्ता अन् केशवनगरमध्ये मार्ग बंद

दोन-अडीच महिन्यांपासून दूध धंद्यातील भेसळखोरीवर धाडसत्र सुरू आहे. यामुळे बाजारात चांगल्या प्रतीच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे. यातून दुधाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मात्र, एका हाताने पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने द्यायचे, परिणामी शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. त्यामुळे ही दूध दरवाढ आभासी ठरत असल्याची खंत दूध उत्पादक जयसिंग जगदाळे यांनी व्यक्त केली.

Milk
Pune Ganeshotsav Live Tableaux: पुण्यात गणेशोत्सवासाठी जिवंत देखाव्यांची जय्यत तयारी! पौराणिक, ऐतिहासिक ते सामाजिक विषयांची मेजवानी

अडीच महिन्यांपूर्वी ५० किलोंची सरकी पेंड १८०० ते साडेअठराशे रुपयाला मिळत होती. आता तीच पेंड अडीच हजार रुपयांवर पोहोचली आहे. भरड धान्य ११०० रुपयांना मिळत होते. त्यासाठी आज १५०० रुपये मोजावे लागतात. गोळी पेंड १४०० रुपयांवरून १८०० रुपयांवर पोहोचली आहे. हिरवा चारा म्हणून वाढे सहा रुपये दराने मिळायचे आज त्याची किंमत नऊ रुपये झाल्याचेही जगदाळे यांनी स्पष्ट केले. पशुखाद्याच्या किमती प्रचंड वाढल्याने दूध उत्पादक अक्षरश: आर्थिक कोंडीत सापडला आहे. या दोन-अडीच महिन्यांत अशी काय कांडी फिरली की, पशुखाद्याच्या किमती वाढल्या आहेत.

Milk
Pune Festival Mangalacharan: पुणे फेस्टिव्हलचा मंगलाचरण सोहळा उत्साहात! ढोल-ताशांच्या गजरात सांस्कृतिक पर्वाची नांदी

त्यातच बदलत्या वातावरणामुळे दुधाळ जनावरांना काशेचे आजार, गोचीड ताप, लाळखूर यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. या आजारांवरती उपचार अत्यंत खर्चिक आहेत, असे मत सुनील गव्हाणे यांनी व्यक्त केले. दुधाचा दर वाढल्याचा खूप मोठा गवगवा झाला, मात्र पशुखाद्य व जनावरांसाठी असणारे औषध उपचार हे कितीतरी पटीने वाढले आहे. सध्या पावसाने पाठ फिरवल्याने ओला चारा मिळत नाही. कडबा किंवा इतर वाळलेला चारा याच्या भरवशावर दूध धंदा करता येत नाही. पर्याय नाही पशुपालक विविध कंपनीचे पशुखाद्य व वैद्यकीय सल्ल्याने दुग्ध व्यवसायामध्ये आर्थिक स्थैर्य शोधण्याचा प्रयत्न करतो.

Milk
Pune Ganeshotsav Immersion: गणरायाच्या स्वागतासाठी पुणे सज्ज! विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी

शेती पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. यासाठी बँका किंवा खासगी सावकारांकडून कर्ज उचलून दुग्ध व्यवसाय केला जातो. अडीच-तीन महिन्यांपूर्वी दुधाळ गाईची बाजारातील किंमत अंदाजे ६० ते ८० हजार रुपये होते. आज त्यामध्ये ३० टक्क्यांची वाढ झाली. सरासरी लाख रुपयाला गाई बाजारात मिळते. म्हशीच्या किमतीतही १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली. मात्र, गाईचे दूध चार रुपये ते जास्त सहा रुपयाने वाढले, तर म्हशीचे दूध सरासरी सहा रुपये ते दहा रुपयांपर्यंत वाढले. मात्र, पशुखाद्य व उपचार खर्च, मजुरी, वाहतूक या सर्वांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी या दरवाढीने फुटत नसल्याचे दुर्दैव वास्तव पाहायला मिळते, अशी माहिती सुनील गव्हाणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news