Maharashtra Milk Adulteration: दूध भेसळ रोखण्यासाठी एफडीएची कडक मोहीम; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना इशारा

अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर तपासणी मोहीम तीव्र; बनावट पनीरवरही कारवाईचा इशारा
Tukaram Mundhe
Tukaram MundhePudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्रातील दूध भेसळयुक्त असल्याच्या चर्चेला मला पूर्णविराम द्यायचा असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गायी-म्हशीच्या दुधाला वाजवी दर आणि ग्राहकांना निर्भेळ व उत्तम गुणप्रतीचे चांगले दूध मिळायला हवे. त्यादृष्टीने अन्नपदार्थांमधील भेसळीचे उच्चाटन करण्यासाठी मी तपासण्यांची मोहीम हाती घेतली आहे.

Tukaram Mundhe
Maharashtra E Hakk System 7/12 Online: ई-हक्क प्रणाली सुरू; सातबारा नोंदींसाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज संपणार

तपासण्या करण्यात, धाडी टाकण्यात अथवा कोणावरही कारवाई करण्यात आम्हाला रस नाही. परंतु, चुकीचे वागणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि ज्यामध्ये भेसळखोरांना पूर्णपणे अटकाव केल्याशिवाय तपासण्यांची मोहीम थांबणार नसल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Tukaram Mundhe
Pune Amenity Space Development: पुण्यात ॲमिनिटी स्पेसवर उद्याने विकसित करण्याचा प्रस्ताव; हरित क्षेत्र वाढवण्यावर भर

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळाने मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात मुंढे यांची भेट घेतली. या वेळी असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक श्रीपाद चितळे, आबासाहेब थोरात आणि कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आगामी काळात राबवायच्या विविध विषयांवर सखोल चर्चा केली.

Tukaram Mundhe
Pune Fake Government Orders Scam: लोणी काळभोरमध्ये बनावट शासकीय आदेश घोटाळा; महसूल नोंदीत फेरफार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दूध भेसळ आणि भेसळीच्या पनीरला अटकाव घालण्यासाठी कल्याणकारी संघाने शासनाच्या दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध विभागास बरोबर घेऊन बनावट पनीरविरोधात ग्राहक जागरूकता मोहीम सुरू केल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. या संयुक्त मोहिमेची फलश्रुती म्हणून आता दुधापासून बनवलेल्या पनीरला ग्राहकांकडून मागणी वाढलेली आहे. शिवाय हॉटेलमध्ये आमच्याकडे ओरिजनल पनीरपासून बनवलेल्या भाज्या उपलब्ध असल्याचे फलक दिसायला सुरुवात झाली असून, शेवटी यातूनच शेतकऱ्यांच्या दुधाला अधिक रक्कम देणे दूध संस्थांना शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.

Tukaram Mundhe
Pune Rave Party Raid Project X: पुणे ग्रामीणमध्ये ‘प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टीवर धाड; 156 तरुण-तरुणी ताब्यात

ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांना प्रमुख अर्थार्जनाचे साधन आहे. पुढील काळामध्ये राज्यातील दूध व्यवसायातील दूध पावडर प्रकल्प आणि पाऊच पॅकिंग करणाऱ्या सर्व दूध संस्थांबरोबर आपण संयुक्त बैठक घेऊ, ही कल्याणकारी संघाची मागणीही मुंढे यांनी मान्य केली आहे. जून महिनाअखेर ही बैठक घेण्याचे नियोजन आहे. त्याचवेळी अन्न व औषध विभागाच्या लॅबोरेटरीज अद्ययावत हव्यात, यावरही त्यांनी सहमती दर्शविली आहे.

प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news