मायलेकींची गळफास घेऊन आत्महत्या : रहाटणी येथील धक्कादायक प्रकार

file photo
file photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा 

कटुंबीयांशी रात्री दोन पर्यंत गप्पा मारल्यानंतर मायलेकींनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार सज्जनगड कॉलनी, रहाटणी येथे उघडकीस आला.

सुनिता युवराज नवले (वय ३६), श्रावणी युवराज नवले (वय १३, रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या मायलेकींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनीता यांचे पती युवराज नवले हे रात्री दोनच्या सुमारास घरी आले. त्यावेळी घरातील सर्वजण गप्पा मारत होते. त्यानंतर ते त्यांचे राहते घराचे टेरेसवर झोपण्यासाठी गेले.

दरम्यान, युवराज यांची पत्नी सुनीता आणि मुलगी श्रवणी यांनी बेडरूममध्ये जाऊन ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी युवराज यांचा मुलगा स्वराज (वय १०)  हा सकाळी लघुशंकेसाठी करता उठला. त्याने आईला आवाज देत बेडरूमचा दरवाजा वाजवला.

मात्र, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याने टेरेसवर झोपलेल्या वडिलांना बोलावून आणले. त्यानंतर त्यांनी बेडचा दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

युवराज यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळेच सुनीता यांनी आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news