

पुणे : शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने जाहीर केले आहे. यात एमएचटी सीईटी 11 ते 26 एप्रिल दरम्यान तर एमबीए 6 ते 8 एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. यासह जवळपास 17 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तसेच एमएचटी सीईटी आणि एमबीएच्या दुसऱ्या सीईटीचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यासाठी सीईटी सेलकडून 19 परीक्षा घेतल्या जातात. परंतु यंदा काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकत्रच परीक्षा घेण्यात येणार आहे.
एमएचटी-सीईटी (पीसीएम) : 14 ते 17 मे
एमएचटी-सीईटी (पीसीबी) : 10 ते 11 मे
एमबीए /एमएमएस : 9 मे
परीक्षा तारीख
एमपीएड : 24 मार्च
फिल्ड टेस्ट : 25 मार्च
एमएड : 25 मार्च
एम. एचएमसीटी: 25 मार्च
बीएड. जनरल
आणि स्पेशल
तसेच बीएड
ईएलसीटी :
एमसीए : 30 मार्च
लॉ (3 वर्षे) : 1 ते 2 एप्रिल
बीपीएड : 4 एप्रिल
बीपीएड फिल्ड
टेस्ट : 5 ते 7 एप्रिल
बी. डिझाइन : 5 एप्रिल
एमबीए/एमएमएस: 6 ते 8 एप्रिल
बीएड व एमएड तीन वर्षे (इंटिग््रेाटेड) : 9 एप्रिल
एमएच एएसीईटी: 10 एप्रिल
एमएचटी-सीईटी
(पीसीएम) : 11 ते 19 एप्रिल
एमएचटी-सीईटी
(पीसीबी) : 21 ते 26 एप्रिल
बी.एचएमसीटी, बीसीए,
बीबीए, बीबीएस,
बीबीएम : 28 ते 30 एप्रिल
डीपीएन/पीएचएन: 5 मे
एमएच. नर्सिंग : 6 आणि 7 मे
लॉ 5 वर्ष : 8 मे