Pune Weather Update: पुणेकरांनो कळजी घ्या! पारा 43 अंशांवर; 128 वर्षांचा रेकॉर्ड तुटला

शहराचा पारा सलग 22 दिवस 40 अंशांपुढे
Pune Weather Update
पुणेकरांनो कळजी घ्या! पारा 43 अंशांवर; 128 वर्षांचा रेकॉर्ड तुटलाPudhari File Photo
Published on
Updated on

Pune temperature reaches 43 degrees

पुणे: शहराचे एप्रिल महिन्यातील सरासरी कमाल तापमान सलग 22 दिवस 40 अंंशांपुढे गेला होता. या बावीस दिवसांत एकदाही मोठा पाऊस पडला नाही. तर लोहगावचा पारा चार दिवस 43 अंशांवर गेल्याने यंदा 128 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. शहरात 30 एप्रिल 1897 रोजी शिवाजीनगरचे तापमान 43.3 अंशांवर गेले होते. त्यानंतर प्रथमच शहर इतके तापले आहे. गेल्या 24 तासात शहराचा पारा 43.2 अंशांवर गेला होता.

पुणे शहर आता थंड हवेचे राहिले नसून ते थेट राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत जाऊन बसले आहे. शहराचा पारा एप्रिलमधील सलग 22 दिवस शिवाजीनगरचे तापमान 40 अंशांपुढे तर लोहगावचा पारा चार दिवस 43 अंशांवर गेला आहे. त्यामुळे शहरात कमालीचा उकाडा निर्माण झाला आहे. पुणे वेधशाळेच्या नोंदीनुसार, शहराचा पारा 30 एप्रिल 1897 नंतर म्हणजे तब्बल 128 वर्षांनी इतक्या विक्रमी तापमानावर गेले आहे.

Pune Weather Update
Drain Cleaning Pune: गाळ वाहतुकीवर आता जीपीएसद्वारे वॉच; अनेक भागात नालेसफाई सुरू

अंगाची लाही, लाही....

बाणेर, शिवाजीनगर, हडपसर, मार्केट यार्ड भागातील ही भरदुपारची स्थिती पाहा. नागरिक भर उन्हात कामानिमित्ताने बाहेर पडत आहेत. मात्र, डोके, डोळे, नाक, कान कापडाने असे झाकून घेत आहेत. एरवी गर्दीत गजबजणारा मार्केट यार्डचा परिसर भरदुपारी असा निर्जन झाला होता.

पुणे राज्यात सतत दुसर्‍या क्रमांकावर

गेले काही वर्षे शहरातील कोरेगाव पार्क राज्यातील सर्वात उष्ण तापमानाच्या यादीत गेले. त्यानंतर यंदा लोहगाव या यादीत गेले आहे. 1 मार्च ते 22 एप्रिलपर्यंतचे दिवस मोजले तर एकूण 53 दिवसांपैकी 40 दिवस शिवाजीनगर 38 ते 40 तर लोहगावचे तापमान सलग 20 दिवसांपेक्षा जास्त वेळा 42 अंशांवर आहे. यंदा लोहगावने कोरेगाव पार्कला मागे टाकत चार दिवस पारा 43 अंशांवर आहे. राज्यातील अकोला, नागपूर, वर्धा या शहरांच्या बरोबरीने पुणे शहर तापले आहे.

Pune Weather Update
Pune Water Supply: शहरातील सोसायट्यांकडून पाण्याची उधळपट्टी; 15 हजार सोसायट्यांमध्ये बेसुमार पाण्याचा वापर

मार्च आणि एप्रिलमध्ये जो सरासरी पाऊस पडतो तो यंदा शहरात झालेला नाही. आत्तापर्यंत कोरेगाव पार्क हॉटस्पॉट होता. यंदा लोहगाव राज्यातील अति तापणाऱ्या भागांच्या यादीत गेले आहे. वाढते शहरीकरण, प्रदूषण या सर्वांचा एकत्रित परिणाम यंदा दिसत आहे. शहराचा पारा यंदा सात्यत्याने 40 अंशांवरच आहे. त्यामुळे एकूण उष्मा खूप जास्त आहे. भरपूर पाणी प्या, सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत काम नसेल तर विनाकरण नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे.

- डॉ. अनुपम कश्यपी, माजी विभागप्रमुख, आयएमडी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news