तरुणाकडून 10 लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त

तरुणाकडून 10 लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भवानी पेठेत ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिट 2 ने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून 52 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 10 लाख 40 हजार असल्याचे सांगितले जात आहे. मुजाहिद अनवर शेख (वय 25, रा गोल्डनसिटी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे आरोपीचे नाव आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागात ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. मागच्या सहा महिन्यांत 7 कोटींचे ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केले आहे. त्या अनुषंगाने शहरात अमली पदार्थविरोधी पथकाकडून पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे.

मंगळवारी समर्थ पोलीस ठाण्याचे कर्मचारी साहिल शेख आणि अझीम शेख यांना खबर्‍या मार्फत रोशन मशीद जवळ एक जण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार भवानी पेठेतील रोशन मशीदजवळ अमली विरोधी पथकाच्या वतीने ट्रॅप लावण्यात आला होता. या वेळी मुजाहिद अनवर शेखची हालचाल संशयित वाटल्याने त्याची झाडाझडती घेण्यात आली. या वेळी त्याच्याकडे 52 ग्रॅम एमडी हे ड्रग्ज आढळून आले. त्याची किंमत 10 लाख 40 हजार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहा पो. आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक डी. एल. चव्हाण, पोलीस कर्मचारी संतोष देशपांडे, संदीप जाधव, साहिल शेख, अझीम शेख, मयूर सूर्यवंशी, योगेश माढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड़ यांनी केली.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news