पुणे : विद्यार्थिनी हल्ला प्रकरण ; गृह विभागाने मागितला अहवाल | पुढारी

पुणे : विद्यार्थिनी हल्ला प्रकरण ; गृह विभागाने मागितला अहवाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात सदाशिव पेठेत भरदिवसा गर्दीच्या रस्त्यावर विद्यार्थिनीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले तसेच पोलिसांवरही जोरदार टीका झाली. त्यामुळे गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी या प्रकरणाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्तालयाला दिले. प्रेमसंबंध संपविल्याच्या कारणातून एकाने तरुणीवर रस्त्याने पाठलाग करून कोयत्याने वार करीत खुनाचा प्रयत्न केला होता. नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तरुणीचा जीव वाचला. तसेच, गेल्या पंधरा दिवसांत शहरात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत.

मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी वारजेतील रामनगर परिसरात एका तरुणावर दोघांनी दोन पिस्तुलांतून चार गोळ्या झाडल्या. तर स्वारगेट परिसरात एका उपनगर वार्ताहरावर गोळीबार करण्यात आला होता. तसेच दोन गटाच्या वर्चस्ववादातून सहकारनगर परिसरात दोनवेळा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. या सर्व घटनांचा अहवाल गृह विभागाकडून मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

ठाकरे गटाच्या लोकसभा जागांवर काँग्रेसचा डोळा

पुणे : कोयत्याने हल्ला करणार्‍याला 4 दिवस पोलिस कोठडी

Back to top button