Pune MD Drugs: पान टपऱ्यांतूनही ‘एमडी’ची विक्री?; कासेवाडी-भवानी पेठेतील अवैध धंद्यांवर नगरसेविकांचा आरोप

फरासखाना पोलिस ठाण्यातील बैठकीत मुद्दा उपस्थित; तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या धंद्यांवर कठोर कारवाईची मागणी
MD Drugs
MD DrugsPudhari
Published on
Updated on

पुणे: पान टपऱ्यांमधूनही ‌‘एमडी‌’सारख्या अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक मुद्दा पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत समोर आला. कासेवाडी आणि भवानी पेठ परिसरात अमली पदार्थांसह अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याची तक्रार नगरसेविका अर्चना पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे.

MD Drugs
Pune Neighbours Fight: लव्हबर्ड आणि मांजराच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; प्रकरण पोलीस ठाण्यात

परिमंडळ क्रमांक एकअंतर्गत येणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागातील नगरसेवकांची बैठक मंगळवारी फरासखाना पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत नगरसेविका अर्चना पाटील यांनी कासेवाडी-डायसप्लॉट परिसरातील बेकायदा धंद्यांवर थेट भाष्य केले. पाटील यांनी केलेल्या निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक 22 कासेवाडी-डायसप्लॉट हा दाट लोकवस्तीचा झोपडपट्टी भाग आहे.

MD Drugs
Shaniwar Wada Fire: १९८ वर्षांनंतर शनिवारवाड्याला पुन्हा आगीच्या झळा; सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघड

या परिसरात अवैध हातभट्टी दारू, चरस, एमडी तसेच ‌‘बटन गोळ्या‌’सारख्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी पान टपऱ्यांमधूनही एमडीसारखे पदार्थ मिळत असल्याची नागरिकांची तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यसनाधीनतेमुळे परिसरातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागात सातत्याने कारवाई करून अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news