Pune MD Drug Seizure: पुण्यात एमडी ड्रग्स तस्करी उघड; दोघांना अटक, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई; एमडी अमली पदार्थासह दोघांना अटक, 26.71 लाखांचा मुद्देमाल जप्त
MD Drugs
MD DrugsPudhari
Published on
Updated on

पुणे: विमानतळ पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एमडी, मोटार असा 26 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय 37, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), उबेर अन्सार खान (वय 27, रा. रेल्वे गेटजवळ, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MD Drugs
Maharashtra Sugarcane FRP Dues: उसाचा एफआरपी थकीत; कारखान्यांचे 30 एप्रिलपर्यंत देण्याचे आश्वासन

पोलिस कर्मचारी हरी पुंडे आणि लालू कऱ्हे या दोघांना बातमी मिळाली होती की, जनक बाबा दर्गा चौकाजवळ खराडी बायपास चौकातून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती एमडी विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या पथकाने प्रीतम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3.59 ग््रॉम एमडी आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

MD Drugs
Maharashtra Kerosene Distribution: केरोसीन वितरणासाठी नवे नियम; प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल

चौकशीत त्याने उबेर खान याचे नाव सांगितले. त्याला देखील पथकाने खुळेवाडी परिसरातून एमडी विक्रीसाठी आला असता पकडले. त्याच्या ताब्यातून चार ग््रॉम एमडी आणि चारचाकी मोटार जप्त करण्यात आली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, पोलिस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news