Maharashtra Kerosene Distribution: केरोसीन वितरणासाठी नवे नियम; प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल

प्रशासनाने केरोसीन वितरणासाठी मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर, अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना प्राधान्य, 45 दिवसांत कोटा उचलणे बंधनकारक
Kerosene
KerosenePudhari
Published on
Updated on

पुणे: केरोसीन (रॉकेल) वितरणाबाबत प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिशिधापत्रिका तीन लिटर केरोसीन देण्यात येणार आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Kerosene
11th Admission Maharashtra: अकरावी प्रवेशाला मोठा प्रतिसाद; चार दिवसांत 1.10 लाख अर्ज

उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेले कुटुंब (ग््राामपंचायत दाखल्यासह) तसेच स्थलांतरित मजूर यांनाही वितरण केले जाईल. केरोसीनचा संपूर्ण कोटा वाटप दिनांकापासून 45 दिवसांत उचलणे बंधनकारक असून, उर्वरित साठा पुढे नेण्यात येणार नाही. वितरण प्रक्रिया तेल कंपन्यांचे वितरक, किरकोळ परवानाधारक/ रास्तभाव दुकानदार, लाभार्थी अशा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यास तीन लीटरप्रमाणे वाटप करणे आवश्यक असून, दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले राहतील.

Kerosene
Savarkar Defamation Case: सावरकर मानहानी प्रकरणात सात्यकी सावरकरांचे न्यायालयात महत्त्वाचे विधान

तेल कंपन्यांनी पुरवठा नियमित ठेवावा, तसेच 85 टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यात उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या देखरेखीखाली वितरण होणार असून, गैरवापर टाळण्यासाठी संयुक्त तपासणी पथक (तहसीलदार, पुरवठा अधिकारी, पोलिस) नियुक्त करण्यात येणार आहे. केरोसीनचा वापर फक्त घरगुती कारणासाठीच करता येणार असून, भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कारवाई करण्यात येईल. संबंधितांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news