Marne Gang MCOCA Case: मारणे टोळीतील दोन आरोपींचा जामीन फेटाळला; मकोका प्रकरणात विशेष न्यायालयाचा निर्णय

आयटी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण; गंभीर गुन्हे, सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुरावे लक्षात घेत न्यायालयाची कठोर भूमिका
MCOCA
MCOCAPudhari
Published on
Updated on

पुणे: कोथरूडमधील आयटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) दाखल गुन्ह्यातील मारणे टोळीतील दोन आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. रूपेश कृष्णराव मारणे (रा. नवएकता कॉलनी, कोथरूड) आणि किरण कोंडिबा पडवळ (वय 31, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. विशेष न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांनी हा जामीन अर्ज फेटाळला आहे.

MCOCA
Patas Railway Station Incident: मालगाडी सुरू होताच महिलेसमोर मृत्यू; रेल्वेरुळांच्या मधोमध झोपून थरारक बचाव

गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी मारणे आणि पडवळ याने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यास, सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. याप्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, टोळीचे वर्चस्व कायम राहावे म्हणून तो करण्यात आला आहे. गजा मारणेला जामीन देताना मागील कोर्टाने काही गंभीर बाबी विचारात घेतल्या नाहीत.

MCOCA
Pune Railway Station Redevelopment: पुणे रेल्वेस्थानकावर विमानतळासारखा ‘होल्डिंग एरिया’; 398 कोटींच्या पुनर्विकासाला वेग

पहिल्या गुन्ह्यात जामिनावर असताना आरोपींनी हा गुन्हा केला आहे. मकोका कायदा कलम 21(5) चा नुसार आधीच्या गुन्ह्यात जामिनावर असताना गुन्हा केला असल्यास जामीन देण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. रूपेशविरोधात 18 गुन्हे असून, त्यापैकी 5 गुन्हे मकोकासंबंधित आहेत. किरणविरोधात तीन गुन्हे दाखल असून, त्यामध्ये एका गुन्ह्यात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

MCOCA
Maharashtra Food Adulteration Action: भेसळखोर व्यापाऱ्यांवर पणन विभागाचा बडगा; परवाना रद्द करण्याच्या सूचना

गोपनीय साक्षीदारांनी दिलेल्या जबाबातून आरोपींचा सहभाग निष्पन्न होत आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असून, त्यांना जामीन मंजूर झाल्यास ते त्यांना मदत करण्याची शक्यता आहे. आरोपींविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तांत्रिक विश्लेषणावरून ते घटनास्थळी हजर होते हे दिसून येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे, असा युक्तिवाद ॲड. बोंबटकर यांनी केला. तो ग््रााह्य धरत न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला.

MCOCA
11th Admission Maharashtra 2026: अकरावी प्रवेशाला सुरुवात; शून्य फेरी 8 मेपासून, पहिली फेरी 21 ते 28 मे

काय आहे प्रकरण?

कोथरूडमधील भेलकेनगर येथे मारणे टोळीतील सराईतांनी देवेंद्र जोग नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना 19 फेबुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली होती. त्याची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी गजानन मारणे याच्यासह रूपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर मकोका कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news