Patas Railway Station Incident: मालगाडी सुरू होताच महिलेसमोर मृत्यू; रेल्वेरुळांच्या मधोमध झोपून थरारक बचाव

पाटस रेल्वेस्थानकावरील घटना; काही क्षण प्रवाशांचा श्वास रोखला, महिला सुखरूप बाहेर येताच सुटकेचा नि:श्वास
Patas Railway Station Incident
Patas Railway Station IncidentPudhari
Published on
Updated on

पाटस: पाटस (ता. दौंड) रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी (दि.9) सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने स्थानकावर उभे असणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. रेल्वेरुळ ओलांडत असताना अचानक मालगाडी सुरू झाल्याने एका महिलेसमोर मृत्यूच उभा ठाकला होता.

Patas Railway Station Incident
Pune Railway Station Redevelopment: पुणे रेल्वेस्थानकावर विमानतळासारखा ‘होल्डिंग एरिया’; 398 कोटींच्या पुनर्विकासाला वेग

मात्र, प्रसंगावधान राखत त्या महिलेने थेट रेल्वेरुळांच्या मधोमध झोपून स्वतःचा जीव वाचवला. काही क्षण चाललेल्या या थराराने स्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला रेल्वेस्थानकाजवळून रेल्वेरुळ ओलांडत होती. त्याचवेळी स्थानकावर थांबलेली मालगाडी अचानक सुरू झाली.

Patas Railway Station Incident
Maharashtra Food Adulteration Action: भेसळखोर व्यापाऱ्यांवर पणन विभागाचा बडगा; परवाना रद्द करण्याच्या सूचना

गाडी वेगाने पुढे सरकत असल्याने महिलेला मागे फिरण्याची किंवा पुढे जाण्याची कोणतीही संधी उरली नाही. क्षणाचाही विलंब न करता तिने धाडसी निर्णय घेत रेल्वेरुळांच्या मधोमध झेप घेतली. यानंतर मालगाडीचे डबे पुढे जात असताना उपस्थित नागरिकांचा श्वास रोखला गेला होता. अनेकांनी डोळे झाकले, तर काही जण मदतीसाठी आरडाओरड करत होते. काही क्षणांनी मालगाडी पुढे गेल्यानंतर महिला सुखरूप बाहेर येताच उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news