Marathi Vishwakosh Dnyanmandal: मराठी विश्वकोशाची ज्ञानमंडळे पुन्हा कार्यान्वित होणार; चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

सुमारे ६५ विषयांतील ज्ञानमंडळांच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; नव्या विषयांचा समावेश, नोंदींचे अद्ययावतीकरण आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर भर
Encyclopedia
EncyclopediaPudhari
Published on: 
Updated on: 

सुवर्णा चव्हाण

पुणे: मराठी विश्वकोशातील नोंदींची व्याप्ती वाढविणे, नव्या विषयांचा समावेश करणे आणि माहितीचे अद्ययावतीकरण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाची ज्ञानमंडळे आता पुन्हा कार्यान्वित होणार आहेत. सुमारे ६५ विषयांतील ही ज्ञानमंडळे नव्याने स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी आवश्यक मान्यता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मान्यता मिळाल्यानंतर जुन्या सदस्यांशी संपर्क साधून नव्या तज्ज्ञांची निवड आणि संबंधित संस्थांशी समन्वय साधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून पुढील चार महिन्यांत ज्ञानमंडळे कार्यान्वित करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. यामुळे विश्वकोशाच्या निर्मितीला आणि अद्ययावतीकरणाला विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन पुन्हा उपलब्ध होणार आहे.

Encyclopedia
Pune FDA Action: पुण्यात गार्डन वडापाव सेंटरला एफडीएचे टाळे; हॉटेल सोनाईवरही कारवाई

राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी आपल्या कार्यकाळात मराठी विश्वकोशाचे काम अधिक गतीने आणि आधुनिक पद्धतीने पुढे नेण्यासाठी ज्ञानमंडळांची संकल्पना राबवली. त्यांच्या कार्यकाळात विविध विषयांवर आधारित एकूण ६० ज्ञानमंडळांची योजना आखण्यात आली होती, ज्यापैकी काही ज्ञानमंडळे वेगाने कार्यरत झाली होती. करंबेळकर यांच्यानंतर डॉ. राजा दीक्षित हे विश्वकोशनिर्मिती मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांना ज्ञानमंडळाच्या कामकाजात काही त्रुटी आढळल्या. त्यामुळे विश्वकोशाच्या नोंदी तयार करण्याच्या कामकाजात शिस्त आणि गुणवत्ता राखण्यासाठी ज्ञानमंडळाची पद्धत त्यांनी स्थगित केली. पण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या काळापासून सुरू असलेली पद्धत त्यांनी पूर्वरत चालू ठेवली. मात्र, आता विश्वकोशाच्या निर्मितीसाठी ही ज्ञानमंडळे महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे घेतला आहे.

Encyclopedia
Pune Water Cut: पुण्यात दर गुरुवारी पाणीकपात; वर्षभरात ३.२१ टीएमसी पाणी वाचविण्याचे उद्दिष्ट

येत्या चार महिन्यांत मंडळे पुन्हा सुरू होतील

डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, ज्ञानमंडळे ही केवळ सल्ला देणारी यंत्रणा नसून, विश्वकोशासाठी विषयतज्ज्ञ आणि लेखक उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा स्रोत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच महाराष्ट्राबाहेरही विविध विषयांवर सखोल अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांचे ज्ञान विश्वकोशाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानमंडळांची मदत होते. या तज्ज्ञांकडून मिळणाऱ्या लेखनाचे संपादन, आवश्यक दुरुस्त्या आणि आशयाची पडताळणी करून विश्वकोशातील नोंदी अधिक परिपूर्ण करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे आता आम्ही ज्ञानमंडळे पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून, त्याला मान्यता मिळाल्यानंतर येत्या चार महिन्यात मंडळे पुन्हा सुरू होतील. विश्वकोशात एखाद्या विषयावरील नोंद उपलब्ध नसल्यास ती तयार करणे, विद्यमान नोंदींचे स्वरूप निश्चित करणे, त्यातील माहितीची पडताळणी करणे आणि नव्या संशोधनाचा समावेश करण्याबाबत ही मंडळे मार्गदर्शन करतील.

Encyclopedia
Pune Garbage Collection: पुण्यात कचरा संकलनाचे यांत्रिकीकरण रखडले; फीडर पॉइंटवरील अस्वच्छता कायम

विषयानुसार तज्ज्ञांची समिती

प्रत्येक ज्ञानमंडळ विशिष्ट विषयासाठी स्थापन केले जाते. त्यात एक समन्वयक आणि त्यांच्या सोयीनुसार पाच, सात किंवा दहा सदस्यांचा समावेश असतो. याशिवाय विषयाच्या गरजेनुसार अन्य लेखकांची मदत घेतली जाते. पुन्हा कार्यान्वित करण्यात येणारी मंडळे मराठी साहित्य, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, राजकारण, धर्मशास्त्र, वनस्पतिशास्त्र, गणित, तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान अशा विविध विषयांसाठी ही मंडळे कार्यरत असतील.

Encyclopedia
Pune Graduate Constituency Election: पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; शंभर टक्के मतदानावर मुरलीधर मोहोळांचा भर

ज्ञानमंडळे पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या दीड काही वर्षांपासून प्रशासकीय आणि प्रक्रियात्मक काम सुरू आहे. नव्याने प्रस्ताव तयार करणे, विषय निश्चित करणे, नियमांमध्ये आवश्यक बदल करणे आणि मान्यतेसाठी प्रक्रिया पूर्ण करणे, यासाठी वेळ लागला. या ज्ञानमंडळांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे, साहित्य संस्था आणि साहित्यविषयक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांशी जोडण्याचाही प्रयत्न आहे. मान्यता मिळाल्यानंतर पूर्वीच्या ज्ञानमंडळांशी संबंधित सदस्यांशी संपर्क साधण्यात येईल. त्यापैकी उपलब्ध असलेल्या तज्ज्ञांशी चर्चा करून नव्या सदस्यांची निवड केली जाईल. गरजेनुसार नव्या अभ्यासकांचा आणि संबंधित संस्थांचा सहभागही घेतला जाणार आहे.

डॉ. रवींद्र शोभणे, अध्यक्ष, राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news