Maratha Reservation : हवेलीतील कुणबी नोंदीची संख्या 21 हजार 788

Maratha Reservation : हवेलीतील कुणबी नोंदीची संख्या 21 हजार 788

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे सुरू करण्यात आलेल्या कुणबी नोंद शोध मोहिमेत हवेली (ग्रामीण) तालुक्यात आतापर्यंत 21 हजार 788 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. अद्यापही भूमी अभिलेख, ब्रिटिश गॅझेटिअर आदी कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात सर्वाधिक शासकीय दप्तरात कुणबी नोंदी सापडलेला हवेली हा पहिला तालुका ठरणार आहे.

गावोगाव मोठ्या संख्येने कुणबी जातीच्या नोंदी आहेत. हवेली तालुक्यातील सर्व 130 गावांतील जन्म-मृत्यू रजिस्टरची तपासणी पूर्ण झाली आहे. या रजिस्टरमध्येच 90 टक्क्यांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तब्बल 20 हजार 950 कुणबी नोंदी या गावातील जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये सापडल्या आहेत. तर शिक्षण विभागात 833 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तालुक्यात पूर्वी 90 महसूली गावे होती. वाड्या-वस्त्यांचा विस्तार होऊन 130 महसुली गावे झाली आहेत. जन्म-मृत्यू रजिस्टर व शिक्षण विभाग या विभागांतील नोंदींची तपासणी झाली आहे. भूमी अभिलेख, ब्रिटिश गॅझेटिअर आदी इतर विभागांच्या दस्तऐवजांची तपासणी अद्याप बाकी आहे.

दीडशे वर्षांपूर्वीच्या नोंदींची तपासणी

हवेली तालुका तहसीलदार किरण सुरवसे यांच्या देखरेखीखाली नायब तहसीलदारांसह आठ कर्मचार्‍यांसह मोडी वाचकांच्या मदतीने तीन लाखांहून अधिक दस्तांची तपासणी केली. दीडशे वर्षांपूर्वीची जीर्ण कागदपत्रे हाताळताना विशेष खबरदारी घेत प्रशासनाने बि—टिश राजवटीपासून ग्रामपंचायती अस्तित्वात येईपर्यंतची गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरची तपासणी पूर्ण केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news