Maratha Reservation | शिक्षक भरतीत मराठा उमेदवारांना संधी !

Maratha Reservation | शिक्षक भरतीत मराठा उमेदवारांना संधी !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने नुकतेच मराठा प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना मराठा आरक्षणानुसार बिंदुनामावली सुधारित करावी आणि त्यानंतरच महाविद्यालयांमधील शिक्षक भरतीची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमधील शिक्षक भरतीत मराठा उमेदवारांना संधी प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकद़ृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) सन 2024 चा महाराष्ट्र राज्य अधिनियम क्र. 16 दि. 26 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिकद़ृष्ट्या मागास वर्ग असा नवीन प्रवर्ग निर्माण केला आहे. या प्रवर्गाकरिता सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये 10 टक्के आरक्षण निश्चित केले आहे. त्यामुळे सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली निश्चित केली आहे.

या सुधारित बिंदुनामावलीनुसार शिक्षकी पदांच्या सरळसेवा भरतीमध्ये आरक्षण निश्चित करून बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणी विद्यापीठाकडून करून घेण्याबाबत पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांमधील सर्व संलग्नित अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
डॉ. खरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणीसाठी कागदपत्रे तयार झाल्यावर विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाच्या रीरज्ञीहरपमरीर्ऽीपर्ळिीपश.रल.ळप या ई-मेल आयडीवर ई-मेलद्वारे महाविद्यालयासाठी बिंदुनामावली तपासून घेण्याची दिनांक व वेळ निश्चित करायची आहे. त्यानंतरच महाविद्यालयांमधील शिक्षक पदे भरण्याची पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news