.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पौड : पुढारी वृत्तसेवा : पिस्तूल रोखत शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुण्यातील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पौड पोलिसांनी महाडमधील एका हॉटेलमधून मनोरमा खेडकर यांना गुरूवारी ( दि.१८) सकाळी अटक केली. त्यानंतर दुपारी पौड येथील दिवाणी न्यायाधीश क स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर.जी.बरडे यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आल्यानंतर मनोरमा खेडकर यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली.
मनोरमा खेडकर यांना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून मनोरमा खेडकर या फरार होत्या. त्यांना आज सकाळी पोलिसांनी महाड येथील एका हाँटेलमधून अटक केली आहे.
पौडचे पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक सावंत, पोलिस हवालदार राँकी देवकाते, पोलिस नाईक सिध्देश पाटील, पोलिस हवालदार तुषार भोइटे, रेश्मा साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.