Mandavgan Farata: धार्मिक परंपरा, बागायती शेती आणि आधुनिक सुविधांनी घडलेले शिरूर तालुक्यातील आदर्श गाव

श्री वाघेश्वर मंदिर, भीमा नदीचे बारमाही सिंचन, आठवडी बाजार आणि सामाजिक ऐक्यामुळे मांडवगण फराटाची वेगळी ओळख
Mandavgan Farata
Mandavgan FarataPudhari
Published on
Updated on

मांडवगण फराटा: भीमा नदीच्या काठावर वसलेले मांडवगण फराटा हे गाव धार्मिक परंपरा, कृषिसमृद्धी, आधुनिक सुविधा आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम साधत शिरूर तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे. सुमारे १९ हजार लोकसंख्येच्या या गावाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधत विकासाचा वेगळा आदर्श घालून दिला आहे.

Mandavgan Farata
Tamhini Ghat Road Closed: ताम्हिणी घाट २५ दिवसांपासून बंद; पर्यटन ठप्प, मुळशीतील शेकडो कुटुंबांचा रोजगार संकटात

लोकवर्गणीतून सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून उभारलेले ग्रामदैवत श्री वाघेश्वराचे भव्य मंदिर हे गावाचे प्रमुख आकर्षण आहे. भीमा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने ऊस, डाळिंब, भाजीपाला आदी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यामुळे हा परिसर बागायती पट्टा म्हणून विकसित झाला आहे.

Mandavgan Farata
Bhongavali Power Project Fire: भोंगवलीतील हाय व्होल्टेज वीज प्रकल्पाच्या कार्यालयाला भीषण आग; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तपासाला वेग

गावातील आठवडी बाजार, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बँका, मंगल कार्यालये आणि इतर सुविधा यामुळे परिसरातील तसेच बाहेरील नागरिकांचेही हे केंद्र बनले आहे. पावसाळ्यात भीमा नदीचा निसर्गरम्य परिसर आणि दौंड-शिरूरला जोडणारा पूल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

Mandavgan Farata
Pune Student Safety: पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; छेडछाडीच्या घटनांवर पालकांमध्ये चिंता

राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजूट राखण्याची परंपरा आजही कायम आहे. याच एकोप्यामुळे मांडवगण फराटा हे गाव विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे.

Mandavgan Farata
Khadakwasla Dam Water Level: खडकवासला धरणसाखळी ९८ टक्के भरली; पावसाचा जोर ओसरताच विसर्ग ८५६ क्युसेकवर कमी

मांडवगण फराटाची वैशिष्ट्ये

  • साडेचार कोटी रुपयांत उभारलेले श्री वाघेश्वर मंदिर.

  • भीमा नदीवरील बंधाऱ्यामुळे बागायती शेतीला चालना.

  • दर शुक्रवारी भरतो मोठा आठवडी बाजार.

  • शिक्षण, आरोग्य, बँका व इतर आधुनिक सुविधा उपलब्ध.

  • चहासाठी दररोज सुमारे ११०० ते १२०० लिटर दुधाचा वापर.

  • सामाजिक सलोखा आणि विकासातील सर्वपक्षीय सहभाग हे गावाचे वैशिष्ट्य.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news