Mandar Kiwale Attack: पिस्तुलासाठी ५५ हजार; आदल्या दिवशी बैठक अन्‌ दुसऱ्या दिवशी हल्ला

शुभमच्या खुनानंतर भाऊ अक्षयने घेतली होती शपथ
Mandar Kiwale Case
Mandar Kiwale CasePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: मंदार किवळेवर शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर झालेला खुनी हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपींनी किवळेवर हल्ला करण्यासाठी १० ते १५ दिवस अगोदर तयारी केली होती. आदल्या दिवशी त्यांनी कात्रज परिसरातील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यासाठी मध्य प्रदेशातून पिस्तुले खरेदी केली होती.

पिस्तुलासाठी ५५ हजार रुपये अक्षय चव्हाण याने दिले होते. किवळे हा शुभम चव्हाणच्या खुनातील आरोपी आहे. एप्रिल २०२५ मध्ये किवळे आणि त्याच्या साथीदारांनी शुभमचा खून केला होता. याप्रकरणी, आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Mandar Kiwale Case
Pune District Court Bomb Threat: पुणे जिल्हा न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा आढावा बैठकीदरम्यान ई-मेल

दरम्यान, चार दिवसांपूर्वी किवळे जामिनावर कारागृहाबाहेर आला होता. बुध‍वारी तो आणि त्याचा साथीदार योगेश ढोरे खटल्याच्या तारखेसाठी शिवाजीनगर न्यायालयात आले होते. त्या वेळी अक्षय चव्हाण, अमोल चव्हाण, ओमकार संतोष ऊर्फ बब्या पवार आणि त्यांच्या साथीदारांनी किवळेवर गोळीबार करून कोयत्याने हल्ला केला. हे तिघेच या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

अमितेश कुमार म्हणाले, की अक्षय चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी गेल्या काही दिवसांपासून किवळेचा काटा काढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यांना काही संधी मिळत नव्हती. अशातच चार दिवसांपूर्वी किवळे जामिनावर कारागृहातून बाहेर आला.

अमोल चव्हाण किवळेवर दाखल गुन्ह्यात फिर्यादी असल्यामुळे त्याला माहिती होते, तारीख कधी आहे. मंगळवारी (दि.२४) रात्री कात्रज परिसरातील एका हॉटेलमध्ये अक्षय चव्हाण, अमोल चव्हाण ओमकार ऊर्फ बब्या आणि इतरांनी बैठक केली. कशाप्रकारे किवळेचा गेम करायचा हे निश्र्चित केले.

Mandar Kiwale Case
Pune onion prices: लाल कांदा आला अन्‌ दर घसरले; पुण्याच्या घाऊक बाजारात भाव किलोमागे दोन ते तीन रुपयांनी उतरले

न्यायालयीन कामकाजासाठी तो बुधवारी शिवाजीनगर कोर्टात येणार असल्याचे आरोपींना माहिती होते. त्यांनी ते ठिकाण निर्धारित केले. काही करून तेथेच किवळेचा गेम करायचा ही तयारी केली. अखेर बुधवारी (दि.२५) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपींना ती संधी मिळाली. कोणतीही तमा न बाळगता ओमकार ऊर्फ बाब्या पवार, प्रथमेश येनपुरे आणि त्यांच्या इतर दोघा साथीदारांनी किवळेवर गोळीबार करीत कोयत्याने हल्ला केला.

शुभमच्या खुनानंतर अक्षयची शपथ

मंदार किवळे, अमर साकोरे आणि त्यांच्या साथीदारांनी शुभम चव्हाणचा खून केल्यानंतर त्याच दिवशी शुभमचा भाऊ अक्षयने किवळे, साकोरे आणि त्यांच्या साथीदारांचा काटा काढण्याची शपथ घेतली होती. तेव्हापासून ते तयारीत होते. तर, बब्या हा शुभमचा निकटवर्ती मित्र आहे.

म्हणून कोयत्याने वार केले

मंदार किवळेसोबतही त्याच्या पोरांचा राबता असतो, याची माहिती अक्षय, बब्या, मळेकर यांना होती. त्यामुळे त्यांनी किवळेचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करायची तयारी केली होती. न्यायालयाच्या बाहेर किवळे याला आरोपींनी पाहिले.

मात्र, त्यांना ती संधी मिळाली नाही. आरोपी परत फिरणार होते. तेवढ्यात किवळे त्यांना एकटा दिसला. सुरुवातीला त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. एक हुकली, तर दुसरे पिस्तूल लॉक झाले. आरोपीपैकी एकाने पिस्तुलाचे बट त्याच्या डोक्यात मारले. त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले.

मध्य प्रदेशातून आणली पिस्तुले

आरोपीपैकी ओमकार ऊर्फ बब्या पिस्तुले खरेदीसाठी मध्य प्रदेशातील उमरटीला गेला होता. २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी ही पिस्तुले आणल्याची माहिती आहे. २५ हजार रुपयांत एक अशी दोन पिस्तुले त्यांनी खरेदी केली होती. ही पिस्तुले खरेदीसाठी ऋषीकेश कोंडे याच्याकडे अक्षयने ५५ हजार रुपये दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.