मंचर: मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत फ्लॉवर व भुईमूग शेंगांसह तरकारी शेतमालाची आवक वाढली. त्यामुळे बाजारभावात वाढ झाली, अशी माहिती सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे तरकारी शेतमालाची एकूण 7270 डाग इतकी आवक झाली. फ्लॉवरला 10 किलोला 330 रुपये, भुईमूग शेंगांला 600 रुपये, गवारीला 900 रुपये असा बाजार भाव मिळाला. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर, शिरूर या भागांतून मोठ्या प्रमाणावर तरकारी विक्रीसाठी येते. (Latest Pune News)
या बाजार समितीची वैशिष्ट्ये म्हणजे तरकारी शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकर्यांना शेतमालाचे वजन, बाजारभाव व एकूण रक्कमेचा एसएमएस लगेच त्यांच्या मोबाईलवर मिळतो. ही विश्वसार्हता असल्याने पाच तालुक्यांतून शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी मंचर बाजार समितीत घेऊन येतात, असे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.
तरकारीची आवक व बाजारभाव
कारले (295) -120-400 रुपये, गवार- (262) 525-900 रुपये, घेवडा (16)-905 रुपये, चवळी (-103)- 330-581 रुपये, ढोबळी मिरची (100) 400-700 रुपये, भेंडी- (161) 335- 621 रुपये, फरशी-(5)-350-400रुपये, प्लॉवर-(2170)-175-330रुपये, भुईमूगशेंगा (332)-200-601 रुपये, दोडका (13)-375-700रुपये, मिरची-(546)-285-550रुपये, तोंडली-(19)-150-350रुपये, शेवगा-(11)-400-580रुपये, लिंबु (3)-300-600रुपये, काकडी-(533)145-270रुपये, कोबी (373) 70-120रुपये, वांगी (113)225-400रुपये, दुधीभोपळा- (113)150-280रुपये, पापडी-(2) 700रुपये, बीट (1113), 135-260रुपये, बटाटा (4), 120-150रुपये, आले (12), 350रुपये, गाजर (28), 150-200रुपये, घोसाळी (11), 150-350रुपये, टोमॅटो (223), 80-310रुपये, मका (176), 50-150रुपये, कैरी (268), 260-500रुपये, फणस-(5)-250रुपये.