Manchar Fake Milk Case: बनावट दूध रॅकेट प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; माहिती देण्यास टाळाटाळ का?

मंचर प्रकरणातील आरोपींची नावे जाहीर न केल्याने चर्चा; पारदर्शक तपासाची नागरिकांची मागणी
Police
PolicePudhari
Published on
Updated on

मंचर: भेसळ दूध रॅकेट प्रकरणात माहिती देण्यास टाळाटाळ झाल्याने मंचर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. यातील काही संशयित राजकीय पक्षाच्या नेत्यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे एकप्रकारे पोलिसांवर दबाव असल्याने त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे समजते.

Police
Manchar Fake Milk Racket: मंचरमध्ये बनावट दूधनिर्मिती रॅकेटचा पर्दाफाश; २६ जणांवर गुन्हा, १,३८५ किलो भेसळयुक्त साहित्य जप्त

मंचर परिसरात उघडकीस आलेल्या बनावट दूध रॅकेट प्रकरणात मूळ सूत्रधार हा मंचर येथीलच असल्याची चर्चा रंगत असून, या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी (दि. ४) दुपारी साडेतीन वाजता अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील दूधसंकलन केंद्रावर कारवाई केली.

Police
Khadakwasla Dam Water Release: खडकवासला धरण ८० टक्क्यांकडे; कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

रात्री सव्वादहा वाजता मंचर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. संयुक्त कारवाई करून संशयित आरोपींना अटक केली व रविवारी (दि. ५) दुपारी घोडेगाव न्यायालयात हजर केले. या कारवाईची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर नागरिकांकडून आरोपींची नावे आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी मोठी उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Police
Daund Heavy Rain Alert: दौंडमध्ये पावसाचा जोर; भीमा नदीला पूर, पाच महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी बंद

दरम्यान, या प्रकरणात सुमारे २६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली असली, तरी प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, अशा कारवायांनंतर अन्न व औषध प्रशासनाकडून नियमितपणे प्रसिद्धिपत्रक जारी केले जाते; मात्र या प्रकरणात संबंधित विभागाकडूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी इतर माध्यमांतून आरोपींची नावे मिळवली आहेत. परंतु, पोलिसांनी त्याची अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही, हे मात्र विशेष.

Police
Shivganga River Bridge Flood: शिवगंगा नदीला पूर; खेड शिवापूरचा पूल पाण्याखाली, भोर-राजगडचा संपर्क तुटला

मंचर पोलिस ठाण्याकडूनही आरोपींची नावे अथवा कारवाईबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नसल्याने नागरिकांसह पत्रकारांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणामागे कोणाचा दबाव आहे का? अथवा माहिती लपविण्यामागे अन्य काही कारण आहे का? याबाबत विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील सर्व माहिती पारदर्शकपणे जाहीर करून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news