Maharashtra Diesel Price Hike: डिझेल दरवाढीचा मंचरमध्ये मोठा फटका; शेतकरी आणि वाहतूक व्यवसायिक चिंतेत

ट्रॅक्टर खर्च, मालवाहतूक आणि बाजारभाव वाढण्याची शक्यता; वाढत्या इंधन दरांमुळे आर्थिक ताण वाढला
Diesel  shortage affects farming
shortage affects farmingAI Image
Published on
Updated on

मंचर: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि वाहतूक व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. शेतीची बहुतांश कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात असल्याने डिझेल दरवाढीचा थेट परिणाम शेती खर्चावर होत आहे.

Diesel  shortage affects farming
PMRDA Road Quality Issue: भामा आसखेड परिसरात 5 कोटींच्या रस्त्याच्या कामावर निकृष्ट दर्जाचा आरोप

नांगरणी, पेरणी, फवारणी आणि मळणी यांसारख्या शेतीकामांसाठी ट्रॅक्टर अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना इंधन दरवाढीमुळे शेती अधिक खर्चिक बनत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

Diesel  shortage affects farming
Baner Pashan Sus Skywalk Demand: बाणेर–पाषाण–सूस उड्डाणपुलावर पादचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; स्कायवॉकची मागणी तीव्र

दुसरीकडे मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टेम्पो, ट्रक आणि इतर वाहनांच्या इंधन खर्चात वाढ झाल्याने वाहतूक दरही वाढू लागले आहेत. भाजीपाला, धान्य, बांधकाम साहित्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Diesel  shortage affects farming
Pune Gang War: पुण्यात टोळीयुद्धाचा स्फोट; आंदेकर-गायकवाड गटात पुन्हा रक्तरंजित संघर्ष

वाहतूक व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने जुन्या दरात मालवाहतूक करणे परवडत नाही. त्यामुळे वाहतूक दर वाढविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. इंधन दरवाढीमुळे शेती उत्पादन खर्चाबरोबरच बाजारातील महागाईही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Diesel  shortage affects farming
Pune Postman Story: ‘ऊन, वारा, पाऊस... सेवा थांबत नाही’; पोस्टमनची संघर्षमय कहाणी

ट्रॅक्टरशिवाय शेतीची कामे करणे शक्य नाही. डिझेल दर वाढल्यामुळे नांगरणीपासून पेरणीपर्यंत प्रत्येक कामाचा खर्च वाढला आहे. आधीच शेती परवडत नसताना आता इंधन दरवाढीमुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत, असे अमोंडीचे उपसरपंच धनंजय फलके यांनी सांगितले. मालवाहतुकीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात डिझेल लागते. इंधनाचे दर सतत वाढत असल्याने जुन्या भाड्यात व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे वाहतूक दर वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news