Pune Bhimashankar Strawberry Festival: भीमाशंकर स्ट्रॉबेरीची पुण्यात धूम; आदिवासी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा

स्ट्रॉबेरी महोत्सवात विक्रीचा उच्चांक; थेट ग्राहक संपर्कामुळे दलालांची साखळी तुटली
Strawberry
StrawberryPudhari
Published on
Updated on

मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला चिंचवड-पुणे येथे आयोजित महोत्सवात मोठी मागणी मिळाल्याने आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळाले आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या स्ट्रॉबेरीची चव आणि गुणवत्ता ग््रााहकांच्या पसंतीस उतरल्याने मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या उपक्रमामुळे शेतकरी आणि ग््रााहक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन दलालांची साखळी तुटली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळाला.

Strawberry
Fake Baba Fraud: निमोण्यात भोंदू बाबा कॅप्टन खरातचा पर्दाफाश; श्रद्धेच्या नावाखाली लुटीचा बाजार

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव आणि ‌‘एसआयआयएलसी पुणे‌’ यांच्या वतीने चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय ‌‘स्ट्रॉबेरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल झाली असून, दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा देणारा ठरला आहे.

Strawberry
Pune Baner Passport Seva Kendra: पुणे बाणेरमध्ये पासपोर्ट केंद्रामुळे वाहतूक कोंडी; उपायांसाठी बैठक

आंबेगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी केलेल्या मागणीची दखल घेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार आदिवासी व कृषी विभागाने विशेष योजना राबवली. यामध्ये उच्च प्रतीची 3125 स्ट्रॉबेरी रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच तसेच आवश्यक जैविक व सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविण्यात आली.

Strawberry
Pune Menopause Clinics: पुण्यात मेनोपॉज क्लिनिकला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तसेच राज्य व जिल्हास्तरावर प्रशिक्षण आणि अभ्यास दौरे आयोजित करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान देण्यात आले. या योजनेत सहभागी झालेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर व आहुपे खोऱ्यातील 183 आदिवासी शेतकऱ्यांनी यशस्वी लागवड करून भरघोस उत्पादन घेतले आहे.

Strawberry
Four Year Degree Honours Course: चार वर्षांची ऑनर्स पदवी सुरू; नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर

महोत्सवात ताज्या स्ट्रॉबेरीसह स्ट्रॉबेरी बर्फी, जॅम, लस्सी, सिरप, मुखवास आणि गुलकंद यांसारख्या प्रक्रियायुक्त उत्पादनांनाही मोठी मागणी मिळाली. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पद्मभूषण गिरीश प्रभुणे, राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या आयुक्त मंजिरी मनोलकर, इस्त्रोचे शास्त्रज्ञ दिलीप देशमुख, प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news