Four Year Degree Honours Course: चार वर्षांची ऑनर्स पदवी सुरू; नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर

महाविद्यालयांना स्वतंत्र परवानगीची अट; संशोधनासह पदवी अभ्यासक्रमालाही मान्यता
Degree
DegreePudhari
Published on
Updated on

पुणे: तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या संलग्न महाविद्यालयांना चौथे वर्ष सुरू करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता असलेल्या महाविद्यालयांना थेट चौथ्या वर्षाचा ऑनर्स अभ्यासक्रम, तर पदव्युत्तरसह पीएच.डी. संशोधन केंद्र असलेल्या महाविद्यालयांना संशोधनासह ऑनर्स (ऑनर्स विथ रीसर्च) अभ्यासक्रम थेट सुरू करता येणार आहे.

Degree
Pune Sadhu Vaswani Bridge Delay: साधू वासवानी पूल रखडला; महापालिका-वाहतूक पोलिस आमने-सामने

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत राज्यात शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून चार वर्षांची ऑनर्स, संशोधनासह ऑनर्स (ऑनर्स विथ रीसर्च) पदवी अभ्यासक्रमासाठीच्या मार्गदर्शक सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमात ऑनर्स आणि संशोधनासह ऑनर्स या चौथ्या वर्षाची तरतूद करण्यात आली आहे.

Degree
Pune Maharera Housing Complaints: रखडलेल्या गृहप्रकल्पांवर महारेराची सुनावणी; घरखरेदीदारांना दिलासा

परंतु या चौथ्या वर्षाबाबत आतापर्यंत मार्गदर्शक सूचनाच नसल्याने महाविद्यालयांच्या स्तरावर संभमाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालयांना चौथ्या वर्षाचा ऑनर्स, संशोधनासह ऑनर्स अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे.

Degree
Pune Rapido Driver Assault: भाडे वादातून रॅपिडो चालकावर हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा

बिगरव्यावसायिक (नॉन एआयसीटीई) अभ्यासक्रमात चौथ्या वर्षासाठी चार वर्षांची ऑनर्स पदवी, संशोधनासह ऑनर्स हे दोन प्रमुख पर्याय उपलब्ध होणार आहेत. ऑनर्स आणि संशोधनासह पदवी या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये मुख्य विषय, बहुविद्याशाखीय दुय्यम विषय, मुक्त निवड विषय, व्यावसायिक व कौशल्यवर्धन अभ्यासक्रम, क्षमतावर्धन अभ्यासक्रम, मूल्यशिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, सहशैक्षणिक अभ्यासक्रम, ऑन जॉब ट्रेनिंग, क्षेत्रीय प्रकल्प, लोकसहभाग प्रकल्प या घटकांचा समावेश असेल.

Degree
Pune Police Extortion: वाघोलीत पोलिसांकडून खंडणी; आयटी अभियंत्याला धमकी, तिघे निलंबित

ऑनर्स अभ्यासक्रमाच्या चार वर्षांत एकूण 160-176 श्रेयांक पूर्ण करणाऱ्या, चार श्रेयांकांचे कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पदवी प्रदान केली जाईल, तर संशोधनासह पदवी अभ्यासक्रमासाठी चौथ्या वर्षाच्या मुख्य विषयात 12 श्रेयांकांचा संशोधन प्रकल्प, प्रबंध पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. संबंधित 12 श्रेयांकांची सातव्या, आठव्या सत्रातील विभागणीचा निर्णय संबंधित विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालयाने घ्यायचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठांच्या विभागांना चौथे वर्ष थेट सुरू करता येणार आहे. संलग्न-स्वायत्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे प्रवेश दिला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news