तळेगाव स्टेशन: मावळातील प्रवाशाला रेल्वेत मारहाण

तळेगाव स्टेशन: मावळातील प्रवाशाला रेल्वेत मारहाण
Published on
Updated on

तळेगाव (पुणे): तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात राहणारे संदीप सिद्राम गोंदेगावे (वय ३७) यांना मंगळवार २५ एप्रिल रोजी सिंहगड एक्सप्रेसमधील जागेवर बसण्याच्या वादातून मारहाण झाली. गोंदेगावे हे सकाळी सव्वा सातच्या सुमारास लोणावळा येथून सिंहगड एक्सप्रेसमध्ये चढले. गाडीमध्ये एक अनोळखी व्यक्ती दोन जागा धरुन बसला होता. त्यातील एक जागा मला दे, असे गोंदेगावे यांनी त्याला सांगत रिकाम्या जागेवर बसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 'या जागा आमच्या आहेत, माझे मित्र येथे बसणार आहेत. तुला येथे बसता येणार नाही', असे त्या व्यक्तीने सांगितले. तसेच गोंदेगावे यांच्या खांद्यावरील बॕगसह त्यांना ओढत नेत त्यांना मारण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या सहा इतर सहकाऱ्यांनी लाथा बुक्यांनी गोंदेगावे यांना मारहाण केली. या मध्ये गोंदेगावे यांना जबर मार बसला असून डोळ्यास इजा झाली आहे. या बाबत संदीप गोंदेगावे यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news