Maalegaon Sugar Factory: माळेगाव साखर कारखाना उभारणार 72 कोटींचा सीबीजी प्रकल्प

अजित पवार म्हणाले – नदीप्रदूषण टळणार, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार
Maalegaon Sugar Factory
माळेगाव साखर कारखाना उभारणार 72 कोटींचा सीबीजी प्रकल्पPudhari
Published on
Updated on

शिवनगर : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा एका वर्षाच्या कालावधीत 71 कोटी 74 लाख रुपये खर्चाचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीबीजे प्रकल्प उभारणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. सदर प्रकल्पास उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. माळेगाव कारखान्याच्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप, उपाध्यक्ष संगीताताई कोकरे, सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.(Latest Pune News)

अजित पवार यांनी सीबीजी प्रकल्पाबाबत व्हीएसआयच्या तज्ज्ञांबरोबर चर्चा करून तसेच वेगवेगळ्या कारखान्यांना भेटी देऊन तेथील चालू प्रकल्पाबाबत माहिती घेऊन प्रकल्प करणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे सांडपाणी वापरात येऊन नदीप्रदूषण होणार नाही. या प्रकल्पाच्या उत्पादनातून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना जास्तीचे पैसे मिळतील, असे त्यांनी नमूद केले.

Maalegaon Sugar Factory
Ashtavinayak Highway: अष्टविनायक महामार्गावरील पोंदेवाडी चौकात अपघातांचे सत्र सुरूच

अजित पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये मतमतांतरे असू शकतात. परंतु, काही निर्णय तातडीने घेऊन अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आपण सगळ्यांनी माळेगाव साखर कारखान्याची धुरा माझ्यावर सोपवली आहे. अत्यंत काटकसरीने पारदर्शकपणे कामकाज करून कारखान्याचे आणि सभासदांचे हित जोपासणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अलीकडच्या काळात एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्पादन वाढविण्यावर आपण सगळ्यांनी भर द्यावा तसेच कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शाश्वत ऊस उत्पादन उपक्रमाच्या माध्यमातून देखील अधिकचे उत्पादन घेण्याचे आवाहन पवार यांनी केले. या वेळी एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी सभासदांचा सन्मान करण्यात आला.

Maalegaon Sugar Factory
Jain Boarding Pune: मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग विक्रीविरोधी आंदोलन, शेतकरी संघटनेचा ठराव

कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी स्वागत केले. अहवालवाचन कार्यालयीन अधीक्षक जवाहर सस्ते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अनिल धुमाळ यांनी केले. संचालक नितीन शेंडे यांनी आभार मानले.

या वेळी युवराज तावरे, दिलीप ढवाण, दशरथ राऊत, डी. डी. जगताप, विलास सस्ते, सुखदेव जाधव, अशोक तावरे, दिग्विजय कोकरे, विनोद जगताप, तानाजी पवार, इंद्रासेन आटोळे, सोपान आटोळे, अरविंद बनसोडे, काळुराम चौधरी, आऊराजे भोसले, राजेश देवकाते, रणजित खलाटे, विक्रम कोकरे, धनंजय गवारे, ज्ञानदेव बुरुंगले, विनायक गावडे, रेहमान शेख आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

Maalegaon Sugar Factory
Shivane cleanliness drive: स्वच्छता अभियानाद्वारे शिवणे- उत्तमनगरमध्ये सफाई

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अभिनंदन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचे चेअरमनपद हाती घेतल्यानंतर केवळ 100 दिवसांच्या आत सभासदांच्या पैशाला हात न लावता सीएसआर फंडातून कारखाना कामकाजासाठी जवळपास 12 कोटी रुपयांची कामे केल्याने सभासदांसह सर्वांनी अजित पवारांचे अभिनंदन केले.

योगेश जगताप यांचे विवेचन...

या वेळी सीबीजी प्रकल्पाची माहिती देताना, अत्यंत सूक्ष्म व अभ्यासपूर्ण विवेचन करून संचालक योगेश जगताप यांनी सभासदांची मने जिंकली.

संचालक नितीन सातव यांचे कौतुक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव कारखान्याने शाश्वत ऊस उत्पादन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कारखान्याच्या सर्व गावांतील कार्यक्षेत्रात सभासदांमध्ये संचालक नितीन सातव अभ्यासपूर्ण जागृती करीत असल्याने सातव यांचे सभासदांकडून कौतुक होत आहे.

Maalegaon Sugar Factory
Bheema Patas Sugar Factory: भीमा-पाटस साखर कारखान्याची सभा खेळीमेळीत पार, विरोधकांशी चर्चा

शरद ऊस समृद्धी बक्षीस योजनेचे पात्र सभासद

संजय यशवंत जगताप (सोनकसवाडी), प्रदीप काशिनाथ जगताप (पणदरे), सुनीता संजय जगताप (सोनकसवाडी), अभयसिंह राजेंद्र घाडगे (मळद), सुरेखा भरत जगताप (पणदरे), तेजस संजय जगताप (पणदरे), रमेश शंकरराव गोफणे (माळेगाव).

एकरी जास्तीचे ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासदांचा सन्मान करताना उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार आणि मान्यवर. (छाया : प्रा. अनिल धुमाळ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news