Malegaon Sugar Factory: माळेगाव साखर कारखाना देशातील आदर्श कारखाना बनवण्याचे स्वप्न; सुनेत्रा पवारांचा निर्धार

वार्षिक सभेत ऊसदर कमी पडू न देण्याची ग्वाही; शेतकरी सभासदांच्या सूचनांचा विचार करण्याचे आश्वासन
Sunetra Pawar
Sunetra Pawar Pudhari
Published on: 
Updated on: 

शिवनगर: माळेगाव सहकारी साखर कारखाना हा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. लोकनेते अजितदादांचे या कारखान्याबद्दल नेहमीच प्रेम राहिले आहे. हा कारखाना देशात आदर्श आणि सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. तेच स्वप्न आपणाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व संचालक, शेतकरी सभासदांना विश्वासात घेऊन कामकाज केले जाईल. सभासदांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री व माळेगाव कारखान्याचे अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (दि.२८) कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.

Sunetra Pawar
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखान्याच्या पॅनेलची उत्सुकता; ५१४ उमेदवार रिंगणात

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, सभापती किरण तावरे, खरेदी-विक्री संघाचे रमेश देवकाते, कृषी उत्पन्न समितीचे विनायक गावडे, विश्वासराव देवकाते, सुयोग सातपुते, संचालक तानाजी कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, स्वप्निल जगताप, अविनाश देवकाते, विजय तावरे, शिवराज जाधवराव, प्रताप आटोळे, राजेंद्र बुरुंगले, गणपतराव खलाटे, सतीश फाळके, विलास देवकाते, जयपाल देवकाते, देविदास गावडे, दत्तात्रय येळे, रामदास आटोळे, विशाल जगताप, संगीता कोकरे, ज्योती मुलमुले, चंद्रशेखर जगताप, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आदींसह शेतकरी सभासद उपस्थित होते.

Sunetra Pawar
Ketan Agarwal Case: केतनला बंगळुरूला नेऊन.... ; पण मित्राच्या 'वेडे आहात का' रिप्लायमुळे प्लान बदलला... नवी माहिती समोर

सभेच्या निमित्ताने अनेक शेतकरी सभासदांनी आपले मनोगत व्यक्त करताना काही सूचना केल्या तसेच कारखान्याच्या कामकाजातील त्रुटी दाखविण्याचा प्रयत्न केला. निश्चितच त्या सर्वांचा विचार करून असणाऱ्या त्रुटी व कामकाजातील अनियमित यामध्ये सुधारणा केली जाईल. माळेगाव कारखान्याची तुलना सोमेश्वर कारखान्याच्या ऊसदराशी केली जाते. माळेगाव कारखान्याचा इतिहासातील हा दिलेला उच्चांकी ऊस दर असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. तसेच यापुढे देखील ऊस दरामध्ये कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.

Sunetra Pawar
Baner Pashan Link Road: बाणेर-पाषाण लिंक रस्त्याचा १५ वर्षांचा भूसंपादनाचा प्रश्न अखेर सुटला!

यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, विश्वासराव देवकाते, योगेश जगताप, नितीन सातव, मदननाना देवकाते, राजेश देवकाते, प्रा. ज्ञानदेव बुरुंगले, दिग्विजय कोकरे, विलास सस्ते, प्रकाश सोरटे, दशरथ राऊत, अरविंद बनसोडे, प्रेमभैया खलाटे, अशोकदादा तावरे, सोपान आटोळे, प्रकाश देवकाते, अशोकबापू जाधव, विकास जगताप, बाबू कारंडे, विश्वास जगताप आदींनी मत व्यक्त केले. स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल धुमाळ यांनी, तर आभार उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी मानले.

ऊस उत्पादकांचा सत्कार

शासनाचा कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल छाया तानाजी पवार यांचा, तर एकरी उसाचे जास्तीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये शशिकांत सुपेकर, तेजस जगताप, प्रदीप जगताप, माधव बनकर, मंगेश सोळणकर, भुजंग टेंगले, गोरख तावरे, अभिषेक तावरे, अशोक तावरे, निलेश टेंगले, कृष्णराव कोकरे, नलिनी जगताप, सूर्यकांत बनकर, पिंकेश जमदाडे, शशांक जमदाडे, धीरज कोकरे, अरविंद निंबाळकर, मनोहर जगताप, जैनुद्दीन मुजावर, देविदास गुरव, अरविंद जगताप, सोनाबाई कोकरे, नंदकुमार जगताप, वर्षा जगताप आदींचा सन्मान करण्यात आला.

Sunetra Pawar
Pune District Cooperative Bank Election: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर पडणार?

सभासदांची जिंकली मने !

माळेगाव कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळी वारंवार सूचना देउनही सभासद ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे उपमुख्यमंत्री व कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांनी स्वतः माईक हातात घेऊन सभेवर ताबा मिळवला व अत्यंत शांत व संयमी भाषेत सभासदांना शांत करत आपले विचार मांडावेत, असे आवाहन केले. त्यामुळे सभेचा नूर पालटून सभासद शांत झाले. त्यानंतर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कामकाजाविषयी तसेच संस्थेच्या सचिवांच्या मनमानी कारभाराविषयी सभासदांनी विचार मांडले. त्याबाबत निश्चितपणे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कामकाजाची सखोल चौकशी करून निर्णय घेतला जाईल. कोणताही अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही.

सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news