Pune District Cooperative Bank Election: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर पडणार?

संचालक मंडळाची मुदत डिसेंबरमध्ये संपणार; मतदार याद्यांच्या कामाला वेग, निवडणुकीच्या निर्णयाकडे सहकारक्षेत्राचे लक्ष
Pune District Cooperative Bank
Pune District Cooperative BankPudhari
Published on: 
Updated on: 

नारायणगाव: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले असल्याने बँकेची निवडणूक नियोजित वेळेत होणार, की पुढे ढकलली जाणार, याकडे सहकारक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Pune District Cooperative Bank
Pune Municipal Corporation Fine: पुणेकरांनो, कचरा टाकणे आता महागणार; महापालिका दंडवाढीच्या तयारीत

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. प्रशासनाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली असून, मतदार याद्या तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. निवडणुकीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय होणार का, याबाबत सहकारक्षेत्रात चर्चा सुरू आहे.

Pune District Cooperative Bank
Yoga Heart Health: हृदयाच्या आरोग्यासाठी योग 'जितका अधिक तितका फायदा' होतो का? तज्ज्ञांनी दिले उत्तर

त्यामुळे प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले. वेळेत निवडणूक झाली तर निवडणुकीत रंगत येऊ शकते. मात्र, निवडणूक पुढे ढकली तर उमेदवारांना फार मेहनत घ्यावी लागणार आहे. 'अ' वर्ग मतदारसंघातील विकास सोसायट्यांनी प्रतिनिधी निश्चितीसाठी केलेले ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठविले आहेत.

Pune District Cooperative Bank
Maharashtra Drought Trigger 1: दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ म्हणजे काय?; निकष वाचा

तसेच 'ब' वर्ग मतदारसंघातील मतदारांची प्राथमिक यादी तयार केली आहे. 'क' वर्ग मतदारसंघातील संस्थांची मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून, 'ड' वर्ग मतदारसंघातील मतदार यादीची कच्ची यादी तयार करण्याचे कामही प्रशासनाकडून सुरू आहे.

Pune District Cooperative Bank
Pune Water Quota: पुणे महापालिकेला विखे पाटलांचा इशारा; पाण्याचा अपव्यय थांबवा, अन्यथा कोट्याचा फेरविचार

कोणत्याच पॅनेलची अद्याप घोषणा नाही

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाकडून अंतिम उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांच्या निवडीबाबतची उत्सुकता कायम आहे. कोणत्या गटातून कोणाला संधी मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक उत्सुकता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या पॅनेलबाबत आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी छाननीनंतर ५१४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीचे चित्र सध्या बहुरंगी झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news