Baner Pashan Link Road: बाणेर-पाषाण लिंक रस्त्याचा १५ वर्षांचा भूसंपादनाचा प्रश्न अखेर सुटला!

महापालिकेने ६८ कोटींची भरपाई जमा करून जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली; रखडलेले काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा
Road
RoadPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहराच्या पश्चिम भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाणेर-पाषाण लिंक रस्त्याच्या भूसंपादनाचा १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या रस्त्यासाठीचा अंतिम निवाडा (अवॉर्ड) जाहीर झाल्यानंतर महापालिकेने सोमवारी जागेचा अधिकृत ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या भूसंपादनासाठी महापालिकेने सुमारे ६८ कोटी रुपयांची भरपाई जमा केली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रखडलेल्या भागाचे काम पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Road
Pune District Cooperative Bank Election: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर पडणार?

महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार (डीपी) पाषाण येथील सर्व्हे क्रमांक १३४ ते १३८ आणि १४० मधून ३६ मीटर रुंदीचा बाणेर-पाषाण लिंक रस्ता प्रस्तावित आहे. सुमारे १.२ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, भूसंपादनातील अडचणींमुळे मधील महत्त्वाचा भाग अपूर्ण राहिला होता. परिणामी, या मार्गाचा वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने वापर करणे शक्य होत नव्हते.

Road
Pune Municipal Corporation Fine: पुणेकरांनो, कचरा टाकणे आता महागणार; महापालिका दंडवाढीच्या तयारीत

भूसंपादनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून महापालिकेने सुमारे ६८ कोटी रुपयांची भरपाई रक्कम जमा केली. कायदेशीर आणि आर्थिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या जागेचा अंतिम निवाडा जाहीर केला. त्यानंतर महापालिकेने सोमवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन अधिकृत ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली.

Road
Yoga Heart Health: हृदयाच्या आरोग्यासाठी योग 'जितका अधिक तितका फायदा' होतो का? तज्ज्ञांनी दिले उत्तर

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन उपायुक्त निखिल मोरे तसेच पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. जागेच्या ताब्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पथ विभागाकडून रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Road
Maharashtra Drought Trigger 1: दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ म्हणजे काय?; निकष वाचा

परिसरातील वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार

या रस्त्यामुळे बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. पश्चिम पुण्यातील वाढती वाहतूक आणि कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता महत्त्वाचा मानला जात आहे. भूसंपादनाचा अडथळा दूर झाल्याने आता उर्वरित कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news