Malegaon Someshwar Sugarcane Rate: माळेगाव- सोमेश्वर ऊसदराची चुरस रंगली; ‘सोमेश्वर’कडून एफआरपीपेक्षा ५१५ रुपये अधिक

माळेगावच्या अंतिम ऊसदराकडे शेतकरी सभासदांचे लक्ष; उत्पादन खर्च आणि उपपदार्थांच्या नफ्याच्या व्यवस्थापनावर आत्मपरीक्षणाची वेळ
Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar FactoryPudhari
Published on
Updated on

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर: बारामती तालुक्यातील माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखाना यांच्यातील ऊसदराची स्पर्धा नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याच्या बाबतीत माळेगाव कारखाना नेहमीच वरचढ राहिला आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत सोमेश्वर कारखान्याने माळेगावसमोर मोठे आव्हान उभे करीत ऊसदराबाबत जोरदार टक्कर दिली आहे. सोमेश्वर कारखान्याच्या ऊसदराच्या तुलनेत माळेगावच्या अंतिम ऊसदराकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे.

Someshwar Sugar Factory
Shikrapur Dolby Laser Action: शिक्रापूर पोलिसांचा डॉल्बी-लेझरला दणका; नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा

सोमेश्वर कारखान्याने सभासदांना नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात तुटलेल्या उसासाठी प्रतिटन ३ हजार ८०० रुपये तसेच फेब्रुवारीतील उसासाठी ३ हजार ९०० रुपये, तर मार्च महिन्यात तुटलेल्या उसासाठी ४ हजार रुपये प्रतिटन ऊसदर अनुदानासह दिला आहे. माळेगाव कारखान्याने प्रतिटन ३ हजार ३०० रुपये व कांडेबिलाचे २०० रुपये असे एकूण प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दिले आहेत. या पार्श्वभूमीवर माळेगावच्या भूमिकेकडे सभासदांमध्ये उत्सुकता आहे.

Someshwar Sugar Factory
Pune Dahi Handi: पुण्यात आज दहीहंडीचा थरार; गोविंदांचे विक्रमी थर अन्‌ सेलिब्रिटींची उपस्थिती

सोमेश्वर कारखान्याने डिस्टिलरी, इथेनॉल प्लँट आणि वीजनिर्मिती या उपपदार्थांच्या प्रकल्पांमधून नफा मिळवण्यावर सातत्याने भर दिला आहे. दुसरीकडे माळेगाव कारखान्याकडेही हे प्रकल्प आहेत. परंतु त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आणि नफ्याचा योग्य ताळमेळ घालून तो दर ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यात माळेगावचे व्यवस्थापन काहीसे मागे पडल्याचे दिसते. दरम्यान, कोणताही सहकारी साखर कारखाना चालवताना व्यवस्थापन महत्त्वाचे असते. यामध्ये कारखान्याची अंतर्गत उधळपट्टी थांबवून उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते, ज्याचा थेट फायदा ऊसदरवाढीसाठी होतो.

Someshwar Sugar Factory
Pune DJ Free Dahi Handi: पुण्यात ३१ गणेश मंडळांची डीजेमुक्त दहीहंडी; लाल महाल चौकात पारंपरिक वाद्यांचा जल्लोष

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ऐतिहासिक वारसा मोठा आहे. मात्र, बदलत्या व्यावसायिक युगात केवळ जुन्या नावावर गाडा चालत नाही. उत्पादन खर्च नियंत्रण, उपपदार्थांचे अचूक व्यवस्थापन आणि पारदर्शक आर्थिक धोरण या त्रिसूत्रीवर सोमेश्वरने मारलेली बाजी ही माळेगावच्या आत्मपरीक्षणाची वेळ आणणारी ठरली आहे. माळेगावने जर आपल्या प्रशासकीय व आर्थिक नियोजनात तातडीने सुधारणा केली नाही, तर निरा खोऱ्यातील ऊसदराच्या स्पधेर्त माळेगावला आपले वर्षानुवर्षे टिकून असलेले अग्रस्थान कायम राखणे कठीण जाणार आहे.

Someshwar Sugar Factory
Pune Dahi Handi Speaker Limit: पुण्यात दहीहंडीचा जल्लोष; ‘चार बास, चार टॉप’पेक्षा अधिक स्पीकर लावल्यास कारवाई

‘सोमेश्वर’कडून ‘एफआरपी’पेक्षा ५१५ रुपये अधिक

सोमेश्वर कारखान्याने एफआरपीपेक्षा प्रतिटन ५१५ रुपये अधिकचा ऊसदर दिला आहे, तर माळेगाव साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा आत्तापर्यंत २३१ रुपये अधिकचे दिले आहेत. त्यामुळे माळेगाव आता अंतिम ऊसदर किती देणार? याकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे. सोमेश्वर आणि माळेगाव साखर कारखाना यांच्यातील चुरस नेहमीच गाजली आहे. कधी काळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याच्या बाबतीत माळेगाव नेहमीच अग्रेसर होता. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत सोमेश्वरचे आर्थिक व व्यवस्थापकीय गणित अधिक सरस ठरत असल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news