Nagar Panchayat Election: ‘माळेगाव’ साठी उमेदवार ठरवणार कोण? अजित पवार आणि रंजन तावरे आमनेसामने!

नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत तिरंगी चुरस; अजित पवारांच्या प्रतिष्ठेची लढत ठरणार निर्णायक
Nagar Panchayat Election
Nagar Panchayat ElectionPudhari
Published on
Updated on

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर: बारामती तालुक्यातीलमाळेगावला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर माळेगावकर प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. अजित पवार आता पक्षाकडून योग्य उमेदवारांना संधी देणार का? कोणत्या उमेदवारांना लॉटरी लागणार? याकडे माळेगावच्या मतदारांचे लक्ष लागले आहे.

Nagar Panchayat Election
ZP Election: वाफगाव-रेटवडी गटात तिरंगी लढत अटळ! रोहिणी थिगळे शिंदे सेनेत दाखल होणार

माळेगाव ग्रामपंचायतीचे २०२१ मध्ये नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले, तेव्हापासून चार वर्षे प्रशासकीय व्यवस्था आहे. नगरपंचायतीला यापुढे विकासकामांसाठी तसेच मूलभूत व भौतिक गरजांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यानुषंगाने माळेगावकरांची एकच अपेक्षा आहे की, नगराध्यक्षांसह निवडले जाणारे नगरसेवक समाजाभिमुख काम करणारे, तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्यांचे निवारण करणारे, लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देणारे, लोकांमध्ये मिसळून काम करणारे आणि लोकांना आपलेसे वाटणारे असावेत.

Nagar Panchayat Election
Child Pneumonia Awareness Maharashtra: लहान मुलांमधील न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखा

शासनाचे जनतेसाठी असणारे वेगवेगळे उपक्रम तसेच शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या निधीच्या अनुषंगाने केली जाणारी कामे यांची सखोल माहिती आणि महत्त्वाचे म्हणजे प्रशासनावर पकड असणारे उमेदवार असावेत, असे मत जाणकार मतदार व्यक्त करीत आहेत, ही अपेक्षा पूर्ण करण्याचे काम आता अजित पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. बारामती शहराचा विकास सर्वांनाच माहीत आहे. त्याच धर्तीवर बारामतीचे उपनगर म्हणून उदयास आलेल्या माळेगावचा विकास व्हावा, हीच जनतेची अपेक्षा आहे.

Nagar Panchayat Election
Pune E-bus: पुणेकरांना केंद्राचे गिफ्ट! लवकरच हजार ई-बस

अजित पवार यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी रंजन तावरे हे भाजपाच्या माध्यमातून सर्व उमेदवार उतरवणार असून, वरिष्ठपातळीवर युतीधर्म पाळण्याच्या सूचना आल्या तर ते देखील मान्य करू; अन्यथा सर्व घटकांतील तुल्यबळ उमेदवारांना एकत्र करीत विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाऊ. यापैकी कोणताही एक पर्याय निवडून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे रंजन तावरे यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी एकास एक तोडीचे उमेदवार दिल्यास ही निवडणूक अटीतटीची होऊन निकाल देखील अनपेक्षित लागू शकतो.

Nagar Panchayat Election
Onion Price Crisis: साठवणूक करूनही कांदा रडवतोय! शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

माळेगाव ग्रामपंचायतीचा पूर्वेतिहास पाहता विरोधकांनी कायमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला धोबीपछाड केल्याचे चित्र आहे. तथापि, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. बारामती शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची ठरणार, हे मात्र नक्की!

Nagar Panchayat Election
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा अहवाल शासनाकडे — जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

शरद पवार गटाची भूमिका गुलदस्त्यात

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही; तथापि पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीची निवडणूक लढवण्याचा निर्धार कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. एकूणच नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पॅनेल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news