गृहप्रकल्पास बांधकाम परवानगी घेताना संबंधित बांधकाम व्यावसायिकास एकूण प्रकल्पाच्या जागेपैकी 5 टक्के जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेस देण्याची नवी अट आहे. त्या जागेत महापालिका दवाखाना, भाजी मंडई, सांस्कृतिक केंद्र असे सार्वजनिक सुविधा निर्माण करते. तसेच, अॅमिनिटी स्पेससाठी 5 टक्के जागा सोडण्याचे बंधन आहे. त्यामुळे तब्बल 10 टक्के जागेत गृहप्रकल्पाचे बांधकाम करता येत नाही. जमिनीचे दर सोन्यापेक्षा अधिक आहेत.