पुणे : रेल्वेच्या पुणे विभागात आता महिलाराज सुरू झाले असून, आता विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि विभागीय वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा यांच्या हाती सूत्रे राहणार आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाच्या कारभाराची जबाबदारी आता या दोन महिला अधिकार्यांकडे आली आहे. एक वरिष्ठ महिला अधिकारी रेल्वेच्या पुणे विभागाचा प्रशासकीय कारभार सांभाळत आहे, तर दुसरी महिला अधिकारी रेल्वे पुणे विभागाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे आता पुणे विभागाचा कारभार पारदर्शी आणि स्वच्छ असेल, अशी अपेक्षा अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.