Pune News: राज्य सहकारी संघावर महायुतीचे वर्चस्व; राज्य सहकार संघाची पंचवार्षिक निवडणूक

समान मते मिळाल्याने तीन संचालक चिठ्ठ्यांवर विजयी
Pune News
राज्य सहकारी संघावर महायुतीचे वर्चस्व; राज्य सहकार संघाची पंचवार्षिक निवडणूकPudhari
Published on
Updated on

पुणे: सहकारात गेली 107 वर्षे सहकार शिक्षण- प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या येथील महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत (2025-2030) 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर व मजूर सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष संजीव कुसाळकर यांच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, सत्तेच्या चाव्या महायुतीकडे गेल्या आहेत.

तर मतमोजणीत जिल्हा सहकारी बोर्ड मतदार संघात तीन उमेदवारांना समान मते मिळाली. त्यावर मतमोजणीत चिठ्ठ्यावर तीन संचालक विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. दरम्यान, सहकार संघाच्या निवडणुकीत संघाचे माजी अध्यक्ष प्रताप बाजीराव पाटील यांना कोल्हापूर विभागातील मतदार संघात आणि संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुहासराव भगवंतराव तिडके यांचा अमरावती विभाग मतदार संघात पराभव झाला आहे. (Latest Pune News)

Pune News
Pune Rave Party Case : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरसह ५ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

संघाच्या निवडणुकीत यापूर्वीच 21 पैकी 9 संचालक बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित 12 संचालकांच्या जागांसाठी 30 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यासाठी राज्यात 27 जुलैला सुमारे 70.8 टक्क्यांइतके मतदान झाले होते.

तर मंगळवारी (दि. 29) निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप, सहाय्यक निबंधक हर्षित तावरे व अन्य अधिकार्‍यांनी संघाच्या वसंतदादा पाटील सभागृहात सकाळी नऊ वाजता मतमोजणीस सुरुवात केली आणि दुपारी निकाल घोषित केला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केली.

विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे:

* विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थांचे वैधानिक कार्यक्षेत्रनिहाय जिल्हा सहकारी बोर्ड प्रतिनिधी मतदार संघ: एकूण 9 संचालक

जिल्हा सहकारी बोर्ड प्रतिनिधी: पुणे विभाग: हिरामण साहेबराव सातकर (बिनविरोध),

कोल्हापूर विभाग: धनंजय सर्जेराव कदम (शेडगे), नाशिक विभाग- संजय वसंतराव पाटील, मुंबई विभाग: प्रवीण यशवंत दरेकर (बिनविरोध), कोकण विभाग: अरुण पालो पानसरे (बिनविरोध), छत्रपती संभाजीनगर- औरंगाबाद विभाग: गुलाबराव आप्पाराव मगर (बिनविरोध), लातूर विभाग - रामकृष्ण मारुतीराव बांगर (चिठ्ठीद्वारे विजय), अमरावती विभाग - विलास सुधाकर महाजन (चिठ्ठीद्वारे विजय), नागपूर विभाग - प्रमोद शंकरराव पिपरे (चिठ्ठीद्वारे विजय).

* विभागीय सहकारी संघ प्रतिनिधी मतदार संघ 1 संचालक ः अशोक विश्वनाथराव जगताप (छत्रपती संभाजीनगर).

* राज्यस्तरीय संघीय सहकारी संस्था प्रतिनिधी 1 संचालक ः प्रकाश यशवंत दरेकर- मुंबई (बिनविरोध).

* इतर संस्था सभासद प्रतिनिधी - 5 संचालक ः संजीव राजाराम कुसाळकर (पुणे), नंदकुमार मानसिंग काटकर (मुंबई), नितीन धोंडीराम बनकर (मुंबई), रामदास शंकर मोरे (वाई- सातारा), सुनील शामराव जाधव पाटील (सांगली).

* अनुसूचित जाती- जमाती प्रतिनिधी 1 संचालक - विष्णू गजाभाऊ घुमरे- मुंबई (बिनविरोध).

* भटक्या विमुक्ती जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी 1 संचालक - अनिल दत्तात्रय गाजरे-मुंबई (बिनविरोध).

* इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघ - 1 संचालक ः अर्जुनराव मल्हारी बोरुडे (अहिल्यानगर).

* महिला प्रतिनिधी 2 संचालक ः जयश्री सोमा पांचाळ (मुंबई), दिपश्री नितेश नलवडे (इचलकरंजी-कोल्हापूर) या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

Pune News
Pune News : खेडच्या जैदवाडीत रस्त्याच्या वादातून दगडफेक, वाहनांची तोडफोड; पोलीस ठाण्यातही बाचाबाची

महायुतीच्या बाजूने मुख्यमंत्र्यांची व्यूहरचना यशस्वी

राज्य सहकारी संघाचे राजकारण पक्षीय नसते. तरीही आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सहकार नेतेच सहकारी संघाचा कारभार चालवत आले. ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या बाजूने व्यूहरचना आखली आणि त्यांचे विश्वासू गटनेते प्रवीण दरेकर यांनी ही व्यूहरचना प्रत्यक्षात आणत सहकार संघावर सहकार पॅनलचे शंभर टक्के वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातून सहकारी संघाचा कारभार प्रथमच निसटला. आता सहकारी संघात नवे युग सुरू होईल अशी खात्री दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news