Yellow Alert: राज्यात मान्सून स्थिरावला; जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’

दोन दिवसांपूर्वीच मान्सूनने महाराष्ट्र व्यापला आहे.
Monsoon Alert
Monsoon AlertPudhari News Network
Published on
Updated on

पुणे: राज्यात मान्सून स्थिरावला असून, पुण्यासह बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ज्या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला, त्या भागात १ जुलैपर्यंत मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Monsoon Alert
Ketan Agarwal Case: सियाला पैसा नाही तर हवं होतं प्रेम...? करोडपती केतन तर दुसरीकडं किराना दुकानदार चेतन

दोन दिवसांपूर्वीच मान्सूनने महाराष्ट्र व्यापला आहे. त्यानंतर राज्याच्या बहुतांश भागात विशेषत: कोकण, मुंबई तसेच विदर्भात मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मान्सून स्थिरावला आहे. काही भागांत आता खऱ्या अर्थाने पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे.

Monsoon Alert
Class 6 Balbharati Book: बालभारतीच्या सहावीच्या पुस्तकात बदल; इतिहासाला प्राधान्य, नागरिकशास्त्रावर प्रश्न

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशीम, यवतमाळ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news